Fake Currency Gang Busted In Shravasti : मदरशात बनावट नोटा छापणार्‍या ५ जणांना अटक

५ पैकी ३ जण हिंदू !

अटक करण्यात आलेले आरोपी पोलिसांसमवेत

श्रावस्ती (उत्तरप्रदेश) – नेपाळ सीमेवरील श्रावस्ती जिल्ह्यात मदरशात बनावट नोटा छापण्याचा कारखाना चालू होता. पोलिसांनी बनावट नोटांच्या व्यवसायात गुंतलेल्या ५ जणांना अटक केली आहे. राम सेवक, धर्मराज शुक्ला, अवधेश कुमार पांडे, जे. अब्दुल रहमान आणि असगर अली अशी आरोपींची नावे आहेत. बनावट नोटा छापण्यासाठीचे यंत्र आणि इतर उपकरणे, तसेच शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. ३५ सहस्र ४०० रुपयांच्या बनावट नोटा आणि १४ सहस्र ५०० रुपयांच्या खर्‍या नोटा जप्त केल्या आहेत. बनावट नोटांमध्ये ५०० रुपयांच्या २६ नोटा, २०० रुपयांच्या १०० नोटा आणि १०० रुपयांच्या २४ नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. प्रत्येकी ५०० रुपयांच्या २९ मूळ नोटाही जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपींनी बनावट नोटा छापून बाजारात चलनात आणल्याची स्वीकृती दिली.

पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी भेसरी कालव्याच्या पुलावरून  तिघांना पकडले. झडतीच्या वेळी त्यांच्याकडून बनावट नोटा आणि पिस्तूल जप्त करण्यात आले. त्यांच्या चौकशीत नेपाळ सीमेवरील लक्ष्मणपूर गावातील एका मदरशात बनावट नोटा छापण्याचा कारखाना चालवला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तेथे धाड घातली.

संपादकीय भूमिका

अशा देशद्रोह्यांना फाशीचीच शिक्षा ठोठावली पाहिजे ! तसेच आता देशातील मदरसे बंद करणे अपरिहार्य झाले असून हिंदूंनी सरकारवर त्यासाठी दबाव निर्माण केला पाहिजे !