जम्मू – येथील नरवाल भागात २१ जानेवारीला झालेल्या २ बाँबस्फोटांमध्ये ५ जण घायाळ झाले. सध्या प्रजासत्ताकदिन आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमध्ये मोठा बंदोबस्त असतांना ही घटना झाल्याने सुरक्षादल अधिक सतर्क झाले आहे. हे बाँबस्फोट नरवाल येथील ट्रान्सपोर्ट नगरच्या यार्ड क्रमांक ७ आणि ९ येथे झाले.
जम्मू कश्मीर: नरवाल इलाके में 2 बम विस्फोट, कई लोग घायलhttps://t.co/7WoZ21WZbZ#bombblast #Narwalarea #JammuandKashmir #peopleinjured pic.twitter.com/G4NFRXzdmH
— Punjab Kesari (@punjabkesari) January 21, 2023
संपादकीय भूमिकाकितीही आतंकवाद्यांना ठार मारले, तरी जम्मू-काश्मीरमधील अशा घटना थांबतांना दिसत नाहीत; त्याचे कारण म्हणजे या आतंकवादामागे असलेला पाकिस्तान आणि त्याची जिहादी मानसिकता ! या दोघांना नष्ट केल्यानंतरच काश्मीरमधील आतंकवाद मुळासह नष्ट होईल ! |