
रायपूर – छत्तीसगडच्या महासमुंद जिल्ह्यातील बसना येथे १ सहस्र १०० धर्मांतरित ख्रिस्त्यांनी मूळ हिंदु धर्मात प्रवेश केला आहे. बसना येथे आयोजित श्रीमद्भागवत कथेच्या वेळी आयोजित कार्यक्रमात या धर्मांतरित ख्रिस्त्यांनी हिंदु धर्मात प्रवेश केला. भाजपचे नेते प्रबल प्रतापसिंह जुदेव यांनी गंगेच्या पाण्याने पाय धुवून सर्वांना हिंदु धर्मात परत आणले.
हिंदु धर्मात प्रवेश केलेल्या लोकांनी, ‘भूलथापांना बळी पडून आम्ही धर्मांतर केले होते; मात्र आमची चूक लक्षात आल्यानंतर आम्ही हिंदु धर्मात परतलो आहोत.’ कथावाचक हिमांशू कृष्ण महाराज यांनी या लोकांना शपथ दिली. जुदेव यांनी सांगितले की, सुमारे ३२५ कुटुंबांतील १ सहस्र १०० लोक सनातन धर्मात परतले आहेत.
ईसाई से हिन्दू बने 1100 लोगों की हुईं घर वापसी…लोगों ने कहा- सभी भटक गए थे इसलिए सनातन धर्म छोड़ दिया था#Conversion #Hindus #homecoming @prabaljudevBJP
https://t.co/p5UGfDcrHA— Sudarshan News (@SudarshanNewsTV) January 20, 2023
१. याआधीही मार्च २०२२ मध्ये महासमुंदच्या कटंगपली गावात आयोजित विश्व कल्याण महायज्ञाच्या वेळी १ सहस्र २५० जणांनी हिंदु धर्मात प्रवेश केला होता.
२. मागील वर्षी ख्रिसमसच्या कालावधीत पाथळगाव येथील ५० ख्रिस्ती कुटुंबांना त्यांच्या मूळ हिंदु धर्मात परत आणले होते.