हिराबांच्या स्वर्गवासाने एक महान जीवन हरपले ! –  सुधीर मुनगंटीवार, वन, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार

‘विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचीच ही हानी आहे. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास हिराबांच्या निधनाने आज संपला.

पंतप्रधान मोदी यांच्या मातोश्री हिराबा मोदी पंचतत्त्वात विलीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आईच्या निधनाविषयी ट्वीट करून सांगितले की, आईचेे जीवन म्हणजे एका तपस्वीची यात्रा होती. आई म्हणजे निष्काम कर्मयोगी आणि आदर्श मूल्यांनी जीवन जगण्याचे प्रतीक आहे.

ढोंगी बुद्धीप्रामाण्यवादी, म्हणजे धर्मद्रोही !

‘डॉक्टर, वकील यांनी सांगितलेले बुद्धीप्रामाण्यवादी लगेच ऐकतात. त्यांना ‘का? कसे?’ विचारत नाहीत; मात्र संतांनी काही सांगितले, तर त्यांच्या मनात ‘का ? कसे ?’, असे प्रश्न निर्माण होतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

कोईम्बतूर येथील बाँबस्फोटातील आतंकवाद्यांचे इस्लामिक स्टेटशी संबंध !

अझहरुद्दीन आणि शेख हिदायतुल्ला हे जिहादी आतंकवाद्यांची भाषणे ऐकत असत. अझहरुद्दीन याने दक्षिण भारतातील अनेक मुसलमान तरुणांना इस्लामिक स्टेटमध्ये भरती केले होते

पाकिस्तानी सैन्याच्या विरोधात पाकव्याप्त काश्मीरमध्ये तीव्र निदर्शने !

पाकिस्तानचे जनताद्रोही स्वरूप जाणा ! याविरोधात आता भारत शासनाने तेथील जनतेच्या पाठीशी उभे राहून त्या भागावर नियंत्रण मिळवून त्यांचे खर्‍या अर्थाने भले करावे !

पाकने त्याच्या देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करावे ! – भारत

केवळ असे सांगून पाक तेथील हिंदूंचे रक्षण करणार नाही. गेली ७५ वर्षे पाकने तेथील हिंदूंचे संरक्षण केलेले नाही. पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत आहे. त्यामुळे भारताने याकडे आता युद्धपातळीवर लक्ष घालणे आवश्यक आहे. केवळ पाकच नव्हे, तर बांगलादेशातील हिंदूंकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.

पाकिस्तानातील सिंधमध्ये हिंदु मुलाला ईशनिंदेच्या आरोपाखाली अटक

पाकिस्तानमध्ये हिंदूंवर अत्याचार चालूच राहिले, तर येणार्‍या काही वर्षांत ते नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. भारत सरकार हे थांबवण्यासाठी काय प्रयत्न करणार ?

देहली येथील सरकारी कर्मचारी तौसीफने महिला कर्मचार्‍यावर वारंवार केला बलात्कार !

देहली परिवहन खात्याच्या बसमध्ये कार्यरत तौसीफ नावाच्या ‘मार्शल’ने (सुरक्षारक्षकाने) त्याच्या सह महिला कर्मचार्‍यावर बलात्कार केला. या प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे.

मांसाहार न केल्यास पशूवधगृहे आपोआप बंद होतील ! – सरसंघचालक

प्राणी हत्येमुळे पाण्याचा खर्च वाढतो. अन्नाचे सूत्र कुणावरही लादता येणार नाही. श्रावण मासात आणि गुरुवारी बरेच लोक मांसाहार करत नाहीत. शाकाहारी असणे वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे.

आटपाडी (जिल्हा सांगली) येथील धर्मांतराच्या प्रकाराचे सखोल अन्वेषण करून योग्य ती कार्यवाही होईल ! – गृहमंत्री

भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत उपस्थित केले आटपाडी (जिल्हा सांगली) येथील धर्मांतराचे सूत्र