आमदार नितीन देशमुख यांच्यावर नोंद झालेल्या गुन्ह्याची माहिती घेऊ आणि त्यांच्यावर अन्याय होणार नाही हे पाहू ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

शिवसेनेचे (उद्धव ठाकरे गट) आमदार नितीन देशमुख यांच्यावर पोलिसांनी ३५३ ‘अ’ गुन्हा नोंद करून त्यांना अटक करणार असे सांगितले आहे. नितीन देशमुख हे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे यांना भेटण्यासाठी गेले होते.

ऊसतोडणी कामगार पुरवणार्‍या मुकादमांकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी ९ जानेवारीला मुंबईत बैठक ! – अतुल सावे, सहकारमंत्री

एकट्या सोलापूर जिल्ह्यातील ३२ साखर कारखान्यांकडे ऊस वाहतूक करणार्‍या वाहनमालकांचे मुकादमांनी मागील गळीत हंगामामध्ये सुमारे १२५ कोटी रुपये बुडवले आहेत. या संदर्भात शासनाने त्वरित कार्यवाही करावी, अशी लक्षवेधी सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली होती.

पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही ! – राज ठाकरे यांची चेतावणी

महाराष्ट्रातील दोन शहरांची तुलना करता मुंबई बरबाद व्हायला वेळ लागला; मात्र पुणे बरबाद व्हायला वेळ लागणार नाही, अशी गंभीर चेतावणी राज ठाकरे यांनी दिली.

भारतद्वेषी ‘डब्लू.एच्.ओ.’ !

प्रत्येक ठिकाणी नाक खुपसणारी ‘डब्लू.एच्.ओ.’ ‘जॉन्सन अँड जॉन्सन’च्या संदर्भात मात्र मूग गिळून गप्प ! जागतिक आरोग्य संघटना या नात्याने या प्रकरणात तिचे दायित्व काहीच नाही का ? बड्या राष्ट्रांतील औषधनिर्माण करणार्‍या श्रीमंत आस्थापनांच्या विरोधात न बोलण्याच्या संदर्भात त्यांचे काही साटेलोटे तर नाही ना ?

पुणे येथे रहाणार्‍या ६ येमेनी नागरिकांवर कारवाई !

कोंढवा येथील परिसरात अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या येमेन देशाच्या ६ नागरिकांवर ‘डिपोर्टेशन’ची कारवाई पुणे पोलिसांनी केली आहे.

नागोठणे (जिल्हा रायगड) येथे लव्ह जिहाद विरोधात पुकारलेल्या बंदला १०० टक्के प्रतिसाद !

नागोठणे येथील हिंदूंनी हीच एकजूट कायम ठेवून लव्ह जिहादविरोधी लढा उभारावा !

हिंदुद्वेषी काँग्रेसला भीक घालू नका !

काँग्रेस अल्पसंख्यांकांसह हिंदूंनाही पक्षासमवेत जोडण्याचा प्रयत्न करत आहे. भारतामध्ये बहुसंख्य लोकसंख्या हिंदूंची आहे आणि नरेंद्र मोदी यांच्या विरोधातील लढाईमध्ये बहुसंख्य समाजालाही घेतले पाहिजे, असे फुकाचे विधान काँग्रेसचे नेते ए.के. अँटनी यांनी केले.

सम्मेद शिखरजी (जिल्हा गिरीडीह, झारखंड) हे जैनांच्या आस्थेचे केंद्र, पर्यटनाचे नाही !

झारखंड सरकारने जैनांचे आस्थेचे ठिकाण सम्मेद शिखरजी पर्यटनक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. या स्थानाचे धार्मिक महत्त्व आणि जैन समाजाच्या भावना या लेखातून मांडण्यात आल्या आहेत.

वाहतूक नियमांची प्रभावी कार्यवाही व्हावी !

‘कायदे तितक्या पळवाटा’, असे असले, तरी प्रभावी कार्यवाही झाली, तरच वाहनचालक पुन्हा चूक करण्यास धजावणार नाहीत, हे निश्चित !

सप्तपदी

सांप्रत काळात कौटुंबिक कलह आणि विभक्तपणा वाढलेला आहे. यामुळे नवदांपत्य आणि अविवाहित यांना थोडे मार्गदर्शन व्हावे, या हेतूने ही लेखनमाला…