
नागपूर, ३० डिसेंबर (वार्ता.) – ‘विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींच्या निधनाची वार्ता दुःखद आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेच नव्हे, तर संपूर्ण देशाचीच ही हानी आहे. त्याग, समर्पण, निष्काम कर्मयोगी जीवनाचा शतकाचा प्रवास हिराबांच्या निधनाने आज संपला. मातृवियोगाचे दुःख मोठे असते. हे दु:ख सहन करण्याची शक्ती पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना मिळो. संपूर्ण देश पंतप्रधान आणि मोदी परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. स्वर्गीय हिराबांना ईश्वर सद्गती देवो. या महान मातेला माझी भावपूर्ण श्र्द्धांजली’, अशा शब्दांत वन, संस्कृतिक कार्य आणि मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शोक व्यक्त केला.
एका युगपुरुषाची जननी…
एक महान जीवन…संपूर्ण राष्ट्र आज विश्वगौरव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुःखात सहभागी आहे…
ईश्वर हीराबांना सद्गती देवो…
विनम्र श्रद्धांजली…#HeerabenModi https://t.co/UbbJ7z8dz4— Sudhir Mungantiwar (@SMungantiwar) December 30, 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जडणघडणीत त्यांच्या मातोश्री हिराबांचा वाटा मोठा आहे. ‘काम करो बुद्धी से, जीवन जीयो शुद्धीसे’ ही त्यांनी दिलेली शिकवण पंतप्रधान मोदी यांनी मोलाने जपली, अशा शब्दांत मुनगंटीवार यांनी स्वर्गीय हिराबांच्या प्रति आदरभाव व्यक्त केला.
पीडित महिला ग्राहकाला ५.१८ लाख रुपये व्याजासह परत करा !
‘कारगिल विजयदिना’निमित्त डोंबिवली येथे ‘ऑपरेशन कारगिल’ आणि ‘ऑपरेशन हिफाजत’ या मोहिमांतील अनुभवकथनाचा कार्यक्रम !
कर्नाटक : रुग्णवाहिका चालक जलील बाबा निघाला अमली पदार्थांचा तस्कर !
गंगा नदीत बिर्याणी खाणे, हा गुन्हा नाही !
संभल (उत्तरप्रदेश) येथे मुसलमानांमधील २ समुदायांमधील वादातून ठार मारण्याची धमकी
BK Hariprasad Karnataka Congress : (म्हणे) ‘सध्याचे केंद्र सरकार पाकिस्तानचे अनुसरण करत आहे !’