पाकने त्याच्या देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण करावे ! – भारत

पाकमधील विधवा हिंदु महिलेच्या निर्घृण हत्येचे प्रकरण

अरिंदम बागची

नवी देहली – पाकिस्तानच्या सिंधमध्ये दया भील या विधवा हिंदु महिलेची बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणी भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, याविषयी आम्ही बातमी पाहिली आहे; मात्र त्या संदर्भात आमच्याकडे विशेष माहिती नाही. आम्ही याचा पुनरुच्चार केला आहे की, पाकिस्तानने त्याच्या देशातील अल्पसंख्यांकांचे रक्षण केले पाहिजे.

पाकच्या सिंधमधील पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या खासदार कृष्णा कुमारी यांनी विधवा महिलेच्या घरी जाऊन तिच्या नातेवाइकांची भेट घेतली. या महिलेचा शिरच्छेद करून तिचे स्तन कापण्यात आले होते. तसेच तिच्या चेहर्‍यावरून कातडीही सोलून तिच्या मृतदेहाचे तुकडे करण्यात आले होते.

संपादकीय भूमिका

केवळ असे सांगून पाक तेथील हिंदूंचे रक्षण करणार नाही. गेली ७५ वर्षे पाकने तेथील हिंदूंचे संरक्षण केलेले नाही. पाकमध्ये हिंदूंचा वंशसंहार होत आहे. त्यामुळे भारताने याकडे आता युद्धपातळीवर लक्ष घालणे आवश्यक आहे. केवळ पाकच नव्हे, तर बांगलादेशातील हिंदूंकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे. अन्यथा अफगाणिस्तानप्रमाणे या देशांत हिंदु औषधालाही शिल्लक रहाणार नाहीत !