पाकचे ‘अ‍ॅप’ आणि ‘संकेतस्थळ’ यांवर भारताकडून बंदी

ही कारवाई नुकतेच प्रदर्शित झालेल्या पाकिस्तानी वेब सिरीज ‘सेवक : द कन्फेशन’ यावरून करण्यात आली आहे. या वेब सिरीजमध्ये भारत आणि हिंदू यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 

समाज आणि सभ्यता यांच्या विकासात मंदिरांची मोठी भूमिका ! – मद्रास उच्च न्यायालय

मंदिरांचे अस्तित्व त्यांच्या आत केल्या जाणार्‍या वेदपठण, भजन, नृत्य, नाटक, कीर्तन इत्यादी उपक्रमांच्या सहअस्तित्वाशी जोडलेले आहे. एक उपक्रम अल्प झाल्यामुळे इतर उपक्रमही अल्प होतात आणि शेवटी मंदिरेच नष्ट होतात ! – मद्रास उच्च न्यायालय

बंगालमध्ये गीता जयंतीनिमित्तच्या रथयात्रेवर तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांचे आक्रमण ! – भाजपचा आरोप

आणखी किती दिवस बंगालमध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि हिंदू मार खात रहाणार आहेत ? बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्याचे धाडस कधी दाखवण्यात येणार ?

सर्वत्रच्या हिंदूंना हिंदु राष्ट्रच खरा आधार !

‘पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका इत्यादी देशांतीलच नव्हे, तर भारतातील काश्मीरसह सर्वत्रच्या हिंदूंना आता कुणाचा आधार नाही. तो देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करणे अपरिहार्य आहे.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

आगरतळा (त्रिपुरा) येथे अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडले !

त्रिपुरा सरकारचा पर्यटन विभाग, ‘अमरवाणी इव्हेंट फाऊंडेशन’ आणि ‘इंडस मून प्रायव्हेट लिमिटेड’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  अष्टलक्ष्मी संत विचार संमेलन भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडले.

‘सोमेश्वर कोठीवाले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे ‘तणावमुक्तीसाठी व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन !

विद्या संवर्धक मंडळाच्या ‘सोमेश्वर कोठीवाले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे ‘सनातन संस्था कोल्हापूर’ न्यासाच्या वतीने डॉ. शिल्पा कोठावळे यांचे ‘तणावमुक्तीसाठी व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते.

सिंधुदुर्ग येथे राष्ट्रीय वनौषधी संस्था उभारण्याच्या कार्यवाहीतील विलंबाविषयी लोकसभेत तारांकित प्रश्न उपस्थित !

सध्या हा प्रस्ताव वित्त विभागाकडे मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. येत्या ३-४ दिवसांत याविषयी वित्त विभागातील प्रशासकीय अधिकार्‍यांची भेट घेऊन त्याविषयीची माहिती मी घेणार आहे.

संभाजीनगर-वैजापूर रस्त्याची दुर्दशा पाहून अभिनेते प्रशांत दामले यांनी काढले प्रशासनाचे वाभाडे !

दिवसेंदिवस सर्वत्रच्या रस्त्यांची दुरवस्था होणे प्रशासनाला लज्जास्पद नव्हे का ?

भगवान श्रीकृष्ण आपल्या घरी यावा, असा ध्यास लागला पाहिजे ! – प.पू. डॉ. श्रीकृष्ण देशमुख

मला ज्ञानी नाही, तर ज्ञानरूप व्हायचे आहे. आपल्याला जर मृत्यूची भीती वाटत असेल, तर हरिपाठ म्हणणे सार्थकी लागले, असे आपण म्हणू शकणार नाही. ‘द्वारकेचा राणा पांडवाघरी’ या उक्तीप्रमाणे भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या म्हणजे अर्जुनाकडेच का आला ?

केक कापून श्री दत्त जन्मोत्सवाची सांगता !

हिंदु धर्मानुसार वाढदिवसासारख्या शुभदिनी केक कापणे किंवा मेणबत्ती विझवणे अशुभ आहे. त्यामुळे कुणाचाच वाढदिवस केक कापून साजरा न करता आरतीने ओवाळून साजरा करावा.