निपाणी (कर्नाटक) – विद्या संवर्धक मंडळाच्या ‘सोमेश्वर कोठीवाले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी’ येथे ‘सनातन संस्था कोल्हापूर’ न्यासाच्या वतीने डॉ. शिल्पा कोठावळे यांचे ‘तणावमुक्तीसाठी व्यवस्थापन’ यावर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. याचा लाभ १५० विद्यार्थ्यांनी घेतला. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. कविता वसेदार, प्राचार्य डॉ. उमेश पाटील, तसेच अन्य शिक्षकांनी साहाय्य केले. मार्गदर्शनानंतर विद्यार्थिनी आणि शिक्षक-कर्मचारी यांच्यासाठी अशाच प्रकारचे मार्गदर्शन आयोजित करण्याची मागणी करण्यात आली.