केक कापून श्री दत्त जन्मोत्सवाची सांगता !

पुणे येथील श्री स्वामी समर्थ सेवासार संघाचा उपक्रम

अक्कलकोट, १२ डिसेंबर (वार्ता.) – श्रीदत्त जयंतीनिमित्त पुणे येथील ‘श्री स्वामी समर्थ सेवासार संघा’च्या वतीने १५१ किलोचा केक कापून श्री दत्त जन्मोत्सवाची सांगता करण्यात आली. श्री क्षेत्र अक्कलकोट येथील ‘श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरा’त मंदिर समितीचे अध्यक्ष तथा नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते केक कापण्यात आला. ८ डिसेंबर या दिवशी श्री वटवृक्ष मंदिरात काकड आरती झाल्यानंतर हा कार्यक्रम पार पडला.

संपादकीय भूमिका 

  • हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याचा परिणाम !
  • देवता अनादी अनंत असतात. त्यांच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्यांचे तत्त्व १ सहस्र पटीने कार्यरत असते. त्याचा लाभ होण्यासाठी अधिकाधिक नामजप करणे आवश्यक आहे. देवतांच्या जन्मदिनाच्या दिवशी केक कापू नये.
  • हिंदु धर्मानुसार वाढदिवसासारख्या शुभदिनी केक कापणे किंवा मेणबत्ती विझवणे अशुभ आहे. त्यामुळे कुणाचाच वाढदिवस केक कापून साजरा न करता आरतीने ओवाळून साजरा करावा.