आज डोंबिवली येथे ‘आपले संविधान’ या ग्रंथाचे प्रकाशन

ठाणे – डोंबिवली ग्रंथालय आणि टिळकनगर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने अन विवेक प्रकाशाच्या वतीने संविधान दिनानिमित्त हिंदुस्थान प्रकाशन संस्थेचे अध्यक्ष श्री. रमेश पतंगे लिखित ‘आपले संविधान’ तत्वविचार-मूल्य संकल्पना-ध्येयवाद या ग्रंथाचे प्रकाशन अधिवक्ता प्रकाश साळशिंगीकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम २६ नोव्हेंबर यादिवशी सायंकाळी ६ वाजता डोंबिवली पूर्व येथील टिळकनगर परिसरातील टिळकनगर विद्यालयाच्या पेंढरकर सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे.