अफझलपूर (कर्नाटक) येथील सरकारी शाळेमध्ये आणून ठेवलेले थडगे प्रशासनाने हटवले !

श्रीराम सेनेने थडगे उद्ध्वस्त करण्याची दिली होती चेतावणी !

 

मध्यभागी श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री सिद्धलींग स्वामीजी

कलबुर्गी (कर्नाटक) – अफझलपूर तालुक्यातील बंदरवाड या गावातील सरकारी प्राथमिक शाळेच्या एका कक्षात धर्मांध मुसलमानांनी आणून ठेवलेले थडगे २५ नोव्हेंबरला पोलिसांच्या उपस्थितीत हटवण्यात आले. २ मासांपूर्वी बंदरवाड शाळेच्या एका कक्षात थडगे आणून ठेवण्यात आले होते. याविषयी कायदेशीर कार्यवाही करून २८ नोव्हेंबरच्या आत थडगे उद्ध्वस्त करण्याची चेतावणी श्रीराम सेनेचे प्रदेशाध्यक्ष श्री सिद्धलींग स्वामीजी यांनी दिली होती. या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस यांनी बंदरवाड येथे धाव घेऊन शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि शाळा विकास व्यवस्थापन समिती यांच्याशी चर्चा केली. शाळेच्या वर्गात ज्यांनी थडगे आणून ठेवले होते, त्यांनीच ते बाहेर आणून वाहानातून मशिदीमध्ये नेले. (ज्यांनी शाळेत ते थडगे आणले, त्यांची सखोल चौकशी करून ‘शाळेत थडगे आणण्यामागील त्यांचा कोणता हेतू होता ?’, त्या द्वारे शाळेच्या आवारात अतिक्रमण करण्याचे त्यांचे षड्यंत्र नव्हते ना ?’, याची चौकशी होणे आवश्यक ! – संपादक) 

संपादकीय भूमिका

‘एका सरकारी शाळेत अशा प्रकारे थडगे आणण्याचे धाडस भाजप सरकारच्या काळात कसे काय केले जाते आणि शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक काहीच कसे बोलत नाहीत ?’, असे प्रश्‍न हिंदूंच्या मनात उपस्थित होतात !