स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि राहुल गांधी यांचा दिसून येणारा फोलपणा !

स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वपूर्ण विचार !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मध्यंतरी त्यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर हे इंग्रजांसाठी काम करत होते’, असे तथ्यहीन वक्तव्य केले. या विधानाच्या विरोधात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष श्री. रणजित सावरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड केला. त्या पत्रकार परिषदेतील काही निवडक भाग येथे प्रसिद्ध करत आहोत.

१. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वतःला सामान्य बंदीवानांप्रमाणे सुविधा मिळण्यासाठी याचिका करणे : स्वातंत्र्यवीर सावरकर यांना वर्ष १९१० ते १९१३ या कालावधीत कारागृहात बंद ठेवण्यात आले होते. अंदमान येथे सामान्य बंदीवानाला सेल्युलर कारागृहात ६ मासांनंतर ठेवून नंतर कारागृहाच्या बाहेर सोडले जायचे; पण स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तो नियम लागू करण्यात आला नाही. अन्य बंदीवानांप्रमाणे तो हक्क मिळावा, यासाठी त्यांनी याचिका केली. ‘तुमच्या नियमाप्रमाणे बाहेर सोडायला हवे होते. तुम्ही आम्हाला अडकवून ठेवले होते’, असे त्यात लिहिले होते.

२. ब्रिटिशांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना सामान्य बंदीवानाचेही अधिकार दिलेले नसणे : ब्रिटीश हे स्वातंत्र्यवीर सावरकर यांना युद्ध बंदीवान मानायचे; पण त्यांना तशा सवलती देत नव्हते. ‘आम्हाला राजबंद्यांचे अधिकार द्या’, असेही स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी सांगितले. गांधी हे आगाखान पॅलेसमध्ये होते; पण सावरकर यांना कोलू ओढावा लागायचा. सामान्य बंदीवानाचेही अधिकार त्यांना दिले नव्हते. यासाठी त्यांनी अर्ज दिला होता. जगात क्रांतीकारक किंवा राजकीय बंदीवान यांना माणुसकीची वागणूक मिळते; परंतु ब्रिटीश साम्राज्यात क्रांतीकारकांना अमानवी वागणूक दिली जात होती’, असे त्यांनी म्हटले. ‘जर हा दयेचा अर्ज केला असता, तर अशी भाषा लिहिली नसती’, असे रणजीत सावरकर म्हणाले.

३. इतर बंदीवानांच्या सुटकेसाठी सावरकर यांनी ब्रिटिशांकडे अर्ज देणे : वर्ष १९१४ मध्ये सावरकरांनी ब्रिटिशांकडे दुसरा अर्ज केला. त्यामध्ये ‘महायुद्ध चालू असल्यामुळे देशावर संकट आहे. त्यामुळे बंदीवानांना सोडा. माझ्याविषयी शंका असेल, तर मला सोडू नका’, असे त्यांनी सांगितले.

४. बंदीवान आणि क्रांतीकारक यांचा प्रथम विचार करून प्रत्येक वेळी सावरकरांनी याचिका प्रविष्ट करणे : वर्ष १९१७ मध्येही अशाच प्रकारचे पत्र स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ब्रिटिशांना लिहिले होते. ‘सर्वांच्या सुटकेत माझ्या नावाचा अडथळा असेल, तर माझे नाव गाळावे. माझ्यापेक्षा इतरांच्या सुटकेने अधिक समाधान मिळेल’, असे त्यात म्हटले होते. वर्ष १९१८ मध्ये ‘जे क्रांतीकारक भूमीगत आहेत, त्यांनाही परत येण्याची संधी मिळावी’, यासाठीही सावरकर यांनी याचिका केली. ‘क्रांतीकारक कुठेही खितपत राहू नयेत’, असे सावरकर यांना वाटायचे.’’

(सौजन्य : Hindusthan Post) 

५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या याचिकेविषयी ब्रिटिशांचे म्हणणे काय होतेे ? : ब्रिटिशांच्या अहवालामध्ये म्हटले आहे की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या दया याचिकेत कुठेही खेद किंवा खंत व्यक्त केलेली नाही. ‘दारूण परिस्थितीमुळे शस्त्र धारण करावे लागले’, असे म्हटले आहे. ब्रिटिशांच्या गुप्तचर यंत्रणेच्या अहवालानुसार, ‘वर्ष १९१३ मध्ये मादाम कामा यांच्याशी सावरकर याचा अंदमानातून गुप्त पत्रव्यवहार चालू होता. त्यामुळे सावरकर यांना मोकळीक देणे शक्य नाही. त्यांना मोकळीक दिली, तर ते पळून जातील. ‘सेल्युअर जेल’बाहेर काढले, तर त्यांची सुटका निश्‍चित आहे.’

६. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहवासात राहिलेल्यांनी त्यांच्याविषयी व्यक्त केलेले विचार !

अ. वर्ष १९०९-१२ मध्ये क्रांतीकारक उल्हासकर दत्त यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले, ‘‘ताप आल्याने मला ३ दिवस भिंतीला टांगून ठेवले होते. जेव्हा बारी (बंदीवानांचा प्रमुख) युद्धासाठी आव्हान देत होता, तेव्हा ‘माझ्या बाजूने विनायक सावरकर लढतील’, असे मी म्हटले. या विधानातून दत्त यांना विनायक सावरकर यांच्याविषयी वाटणारा विश्‍वास दिसून येतो.

आ. वर्ष १९१३ मध्ये सुराज्य वृत्तपत्राचे पत्रकार रामचरण शर्मा यांना १० वर्षांचा कारावास झाला. त्या वेळी ते म्हणाले, ‘‘विनायक सावरकरांनी ५० वर्षे काढली, तर मीही १० वर्षे काढीन.’’

इ. भाई परमानंद यांनी वर्ष १९१९ मध्ये लिहिले, ‘‘अंंदमान येथे कोणतीही दंगल झाली, तर इंग्रज सावरकरांना उत्तरदायी धरत.’’

ई. काकोरी कटामध्ये शिक्षा झालेले सचिंद्रनाथ संन्याल यांना जन्मठेप झाली. ते शेवटपर्यंत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या समवेत होते. सावरकर हे इंग्रजांना शरण गेले असते किंवा त्यांनी पराभूत मनोवृत्ती बाळगली असती, तर सचिंद्रनाथ संन्याल त्यांच्यासमवेत राहिले असते का ?

७. राहुल गांधी यांचा मूर्खपणा ! : त्या मूर्ख माणसाने (राहुल गांधी यांनी) केवळ पत्राचा मायना (आशय) म्हणजे केवळ त्याचे गुगल भाषांतर वाचून दाखवले. असे आहे, तर मग गांधीनीही लिहिले होते, ‘मी तुमचा आज्ञाधारक नोकर बनू इच्छितो.’ राहुल गांधींचा न्याय महात्मा गांधींना लावून पहायचा का ? खरेतर ही त्या काळची पद्धत होती. हा त्या काळी असे लिहिण्याचा मायना होता.

८. गांधी यांची देशविघातक वृत्ती दर्शवणारी उदाहरणे !

८ अ. गांधींनी केलेला भारताचा विश्‍वासघात ! : महात्मा गांधी यांनी ‘खिलाफत चळवळी’सारख्या राष्ट्रबाह्य चळवळीला पाठिंबा दिला. केवळ स्वराज्याचे कारण त्यात दाखवले. त्यानंतर हिंसाचाराचे सोयीस्कर कारण देत आंदोलन मागे घेतले.

८ आ. गांधी यांनी प्रयत्न केला असता, तर भगतसिंह यांचे प्राण वाचले असते ! : काँग्रेसने गोलमेज परिषदेत सहभागी व्हावे, यासाठी इंग्रजांनी ‘काँग्रेसच्या सर्व नेत्यांवरील खटले मागे घ्यावेत, तसेच हिंसक नसलेल्या जनतेवरील खटले मागे घ्यावेत’, अशी अट घातली. काँग्रेसवरील खटले मागे घेण्यात आले; मात्र जनतेवरील खटले मागे घेतले गेले नाहीत. ‘गांधी-आयर्विन अ‍ॅक्ट’ हा करार १ वर्ष आधीच केला असता, तर भगतसिंहांचे प्राण वाचले असते. याला देशाशी केलेला द्रोह म्हणतात.

८ इ. गांधींची अजब मागणी आणि तिला आंबेडकर अन् स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी केलेला विरोध : वर्ष १९४२ च्या ‘छोडो भारत’ आंदोलनाला सावरकरांनी विरोध केला. ‘ब्रिटिशांनी भारत सोडावा; पण त्यांचे सैन्य इथेच ठेवावे’, अशी गांधींची मागणी होती; पण ही मूर्खपणाची मागणी होती. तिला अर्थच नव्हता. महंमद अली जीना यांना गांधींनी पंतप्रधानपदाचा प्रस्ताव दिला. याला सावरकर आणि डॉ. आंबेडकर यांनीही विरोध केला. राहुल गांधी यांच्यामध्ये डॉ. आंबेडकर यांना विरोध करायचे धारिष्ट्य आहे का ? आंबेडकरवादी आज त्यांच्यासमवेत आहेत. त्या काळी आंबेडकर आणि सावरकर यांनी विविध परिषदा घेऊन गठबंधन निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता.

९. सावरकर आणि नेताजी सुभाषचंद्र यांच्यातील साम्य; पण अवहेलना केवळ सावरकरांचीच ! : सावरकरांनी केलेल्या भारतीय सैन्यभरतीविषयी नेताजी सुभाषचंद्र बोस म्हणतात, ‘ब्रिटीश जी भरती करत आहेत, त्यात तुमची विश्‍वासू माणस भरती करा.’ दोघांनीही सैन्यभरतीविषयी समान सूत्र सांगितले होते, मग केवळ सावरकर यांच्यावरच आरोप का ?

१०. गांधींचा उदोउदो आणि सावरकरांना मात्र असह्य यातना ! : वर्ष १९४२ चे आंदोलन ५ दिवसांत चिरडले गेले. पहिल्याच दिवशी सगळ्यांना पकडले. गांधी सोडून सगळ्यांना अहमदनगर येथे राजेशाही थाटात ठेवण्यात आले. त्या आंदोलनाचे नियोजनच नव्हते. गांधी येरवडा कारागृहात असतांना तेथील ‘जेलर’ने गांधीजींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांना चांदीचे ७५ शिक्के दिले. बकरीच्या दुधाचे आईस्क्रीम दिले. सावरकर यांना मात्र कारागृहानंतरही १४ वर्षे अज्ञातवासात रहावे लागले.

११. अंतरिम पंतप्रधानपदाची विराजमान होतांना ब्रिटीश सरकारशी एकनिष्ठ रहाण्याची शपथ घेणार्‍या जवाहरलाल नेहरू यांच्या वंशजांना सावरकरांवर टीका करण्याचा काय अधिकार ? : वर्ष १९४६ मध्ये जवाहरलाल नेहरू यांनी अंतरिम पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्या वेळी त्यांनी ब्रिटीश सरकार, त्यांचे वंशज अन् वारस यांच्याशी आजन्म एकनिष्ठ रहाण्याची शपथ घेतली. असे असतांना नेहरूंच्या घराण्यातील (दिवटे) वंशज राहुल गांधी हे सावरकर यांच्यावर कोणत्या तोंडाने टीका करतात ? सावरकरांनी तर अशा स्वरूपाचे वचनही कधी दिले नव्हते. मग त्यांच्यावरच टीका का ?

(उर्वरित भाग वाचण्यासाठी इथे क्लिक करा)