चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्गामध्ये तुर्कीयेला सहभागी होण्यासाठी पाकचे आमंत्रण

पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ

इस्लामाबाद (पाकिस्तान) – चीन-पाकिस्तान आर्थिक महामार्ग योजनेमध्ये तुर्कीये देशालाही सहभागी होण्याचे आमंत्रण देण्यात आले आहे. पाकचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी हे आमंत्रण दिले आहे. ‘जर तुर्कीयेने याला संमती दिली, तर चीनशी याविषयी चर्चा करू’, असे शरीफ यांनी म्हटले आहे. भारत या योजनेला सातत्याने विरोध करत आहे. (पाकच्या या धूर्त खेळीला भारताने रोखठोक उत्तर दिले पाहिजे ! – संपादक)