सवंग लोकप्रियतेच्या हव्यासापोटी अंनिसचे नाशिकमधील ईशान्येश्वर मंदिर संस्थानला फुकाचे आव्हान !
नाशिक – ‘अंकाद्वारे भविष्य पहाणे, हे शास्त्र आहे, हे सिद्ध करा आणि २१ लाख रुपये जिंका’, असे आव्हान महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांनी येथील ईशान्येश्वर संस्थानला २५ नोव्हेंबर या दिवशी दिले आहे. नाशिक दौर्यावर असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्र्यांना समवेत घेऊन ईशान्येश्वर मंदिरात भविष्य पाहिल्याची चर्चा सध्या चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर अंनिसने हे आव्हान दिले आहे. (इतरांना असे ‘अविवेकी’ आव्हान देण्यापेक्षा अंनिसने अगोदर स्वतःच्या संघटनेतील भ्रष्टाचार दूर करण्याचा ‘विवेक’ दाखवावा ! – संपादक)
१. ईशान्येश्वर मंदिरातील संबंधिताने २४ नोव्हेंबर या दिवशी प्रसारमाध्यमांतून असे घोषित केले की, आमच्या येथे कुंडली पाहिली जात नाही किंवा हातही पाहिला जात नाहीत. त्यांचा हा दावा अंनिसला मान्य आहे.
अंनिसने इशान्येश्वर मंदिर संस्थानला दिलेलं चॅलेंज काय ? म्हणाले सिद्ध करून दाखवा आणि 21 लाख रुपये जिंका… https://t.co/s7jJxmFScv#ANNIS #nashiknews
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 25, 2022
२. याविषयी कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे की, संबंधित व्यक्ती अंकशास्त्राची अभ्यासक आहे. अंकशास्त्रात कुंडली अथवा हात पाहिला जात नाही. तथापि संबंधित व्यक्तीने ज्योतिष पहात असल्याचा दावा खोडून काढला नाही. ते अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पहात नसतील, तर तसा फलक त्यांनी मंदिरात लावावा आणि जनता फसवणुकीपासून दूर रहावी; म्हणून तसे हमीपत्र लिहून द्यावे. (कुणी काय करावे आणि काय करू नये ?, हे ठरवण्याचा अधिकार अंनिसला कुणी दिला ? त्यापेक्षा अंनिसने स्वतःच्या संघटनेतील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्या चालू असलेल्या कलहाकडे लक्ष द्यावे ! – संपादक) अन्यथा अंकशास्त्र हे शास्त्र असल्याचे सिद्ध करावे. तसे केल्यास अंनिस जनतेतून मिळवलेले २१ लाख रुपये त्यांना पारितोषिक देईल. (अंनिसचे हास्यास्पद आणि कीव आणणारे आव्हान ! – संपादक)
३. मुख्यमंत्र्यांनी रुद्र पूजा करण्यास अंनिसचा विरोध नाही. भारतीय राज्यघटनेने प्रत्येकास श्रद्धा आणि उपासना यांचा अधिकार दिला आहे; परंतु संबधित व्यक्तीची ख्याती पहाता ‘ही पूजा भविष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी केलेला तोडगा असावा’, असा अंनिसला संशय आहे; कारण ही पूजा अमावस्येला केली गेली आहे. यासह ‘ही पूजा करण्यासाठीच मुख्यमंत्र्यांनी शिर्डीच्या नावाखाली नाशिक दौरा आयोजित केला कि काय ?’, अशी शंका उपस्थित होते.
Nashik News : सिन्नरच्या ईशान्येश्वर मंदिराला अंधश्रद्धा निर्मूलन समितीने खुले आव्हान दिले आहे. https://t.co/1dFBo8d5f3#Nashik #NashikNews
— ABP माझा (@abpmajhatv) November 25, 2022
मुख्यमंत्र्यांना रुद्र पूजा करायची, तर ते मुंबई अथवा कुठेही करू शकत होते; मात्र ती पूजा ईशान्येश्वर मंदिरात केली. अंकशास्त्राच्या आधारे भविष्य पाहून हा तोडगा केला असावा, असा संशय अंनिसला आहे. (अंनिसचे ‘अविवेकी’ तर्क ! मुख्यमंत्र्यांनी पूजा कुठे करावी आणि कुठे नाही ?, हे ठरवण्याचा अंनिसला काय अधिकार ? हा मुख्यमंत्र्यांचे व्यक्तीस्वातंत्र्य धार्मिक स्वातंत्र्य यांवर घाला घालणेच नव्हे का ? – संपादक)
४. नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी ‘या पुजेला अंधश्रद्धा म्हणणे चुकीचे आहे’, असे म्हटले आहे. महाराष्ट्र अंनिस सर्वांच्या श्रद्धा आणि उपासना यांचा आदर करते; परंतु कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या ज्योतिषाला विरोध करते; कारण ज्योतिष हे शास्त्र नसून थोतांड आहे. ते स्वप्न विकण्याची कला आहे. जनतेने अशा लोकांपासून दूर रहावे आणि अंधानुकरण करू नये, असे कृष्णा चांदगुडे यांनी म्हटले आहे. (ज्योतिष हे थोतांड असल्याचे आतापर्यंत अंनिसने कधीतरी सिद्ध करून दाखवले आहे का ? आतापर्यंत बहुतांश सर्वच पक्षांतील लोकप्रतिनिधींनी ज्योतिषावर विश्वास ठेवला आहे. निवडणुकीत उमेदवारी अर्ज प्रविष्ट करण्यापूर्वी ज्योतिषाकडे भविष्य विचारण्यासाठी मंत्री आणि लोकप्रतिनिधी गेलेे आहेत. ज्यांना हिंदु धर्म, संस्कृती आणि ज्योतिष यांची कावीळ झाली आहे, अशा संघटना असा आरोप करतात, यात आश्चर्य ते काय ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|