मालेगाव बाँबस्फोट प्रकरणातील २९ साक्षीदारांना एन्.आय.ए. न्यायालयाने फितूर घोषित केले !
साक्षीदाराने ‘कुठल्याही प्रकारचा मी जबाब दिलेला नाही, तसेच स्वाक्षरीही केलेली नाही. आरोपींना ओळखण्यापासूनही नकार दिला आहे’, असे सांगितले. त्यामुळे न्यायालयाने या प्रकरणात २९ साक्षीदारांना फितूर म्हणून घोषित केले आहे.
मुंबईत पदपथावरून १ वर्षाच्या मुलीला पळवणारी महिला गजाआड
सीसीटीव्ही कॅमेर्यातील चित्रणावरून तिचे छायाचित्र काही लोकांना दाखवल्यावर त्यांनी या महिलेला ओळखले होते. भ्रमणभाषच्या स्थानावरून ती तेलंगाणाहून सोलापूर येथे येत असल्याचे कळले. सोलापूर येथे आल्यावर पोलिसांनी तिला लगेच अटक केली.
संभाजीनगर येथील ‘हज हाऊस’च्या मिनारमध्ये शौचालय बांधल्याने मुसलमान संतप्त !
संबंधित अधिकार्यांवर कारवाई न केल्यास अधिकार्यांच्या दालनात शौचालय बांधणार !
कोल्हापूर येथील पंचगंगा नदीघाटाची दुरवस्था : महापालिका प्रशासन आणि पुरातत्व विभाग यांचे दुर्लक्ष
त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने मोठी आरती केली जाणार आहे. हा घाट दिव्यांनी उजळून जातो; मात्र हा ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून अथवा जिल्हा प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होतांना दिसत नाहीत.
बाणगंगेच्या महाआरतीचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा ! – प्रवीण कानविंदे, अध्यक्ष, गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट
काशी आणि वाराणसी येथे ज्या पद्धतीने असंख्य दिवे लावून गंगेची आरती केली जाते. त्याचप्रमाणे बाणगंगा येथे त्रिपुरा पौणिमेला (७ नोव्हेंबर) सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होणार आहे.
वक्फ कायदा देशविघातक असून हा विषय संसदेत मांडणार ! – उन्मेष पाटील, खासदार, भाजप, जळगाव
भाजप उपशहर प्रमुख श्री. विवेक ठाकूर, हिंदुत्वनिष्ठ श्री. जगदीश ठाकूर, श्री. प्रकाश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे यांच्यासह स्थानिक धर्मप्रेमी बांधव यांनी ४ नोव्हेंबर या दिवशी भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांची एरंडोल येथे भेट घेतली.