संबंधित अधिकार्यांवर कारवाई न केल्यास अधिकार्यांच्या दालनात शौचालय बांधणार !
संभाजीनगर – येथे निर्माणाधीन हज हाऊसच्या मिनारमध्ये शौचालय बांधण्यात आल्यानंतर मुसलमान समाजातील सदस्यांनी संताप व्यक्त केला आहे. हा रोष विशेषतः हज हाऊसचा ठेकेदार आणि ‘सिडको’ प्रशासन यांच्या विरोधात आहे. या दोघांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी होत आहे. कारवाई न झाल्यास संबंधित अधिकार्यांच्या दालनामध्ये शौचालय बांधण्याची चेतावणी देण्यात आली आहे.
हज हाउस के मीनार में शौचालय से भड़के मुस्लिम, वेस्टर्न कमोड बनने के बाद FIR की माँग: शरद पवार की पार्टी के नेता ने कहा – अधिकारी के केबिन में बना दूँगा शौचालय#Aurangabad #Maharashtra #HajHouse #Toilethttps://t.co/GFdCzL3k5d
— ऑपइंडिया (@OpIndia_in) November 5, 2022
हिमायत बाग परिसरात हज हाऊसचे बांधकाम चालू आहे. येथे हज हाऊसच्या याच इमारतीत एक मिनारही बांधण्यात आला आहे. हज हाऊसच्या ठेकेदाराने या टॉवरमध्ये शौचालयही बांधले असल्याचा आरोप होत आहे. स्वच्छतागृह विदेशी पद्धतीचे आहे. ही गोष्ट स्थानिक मुसलमानांना कळताच त्यांनी विरोध चालू केला. धार्मिक भावनांचा अवमान केल्याप्रकरणी कंत्राटदारावर गुन्हा नोंद करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
मिनारमधील शौचालयाचे बांधकाम न थांबवल्यास सिडको अधिकार्यांच्या दालनामध्ये शौचालय बांधण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाजीनगर शहराध्यक्षांनी केली जी आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही हज हाऊसच्या टॉवरमध्ये बांधल्या जाणार्या शौचालयाला विरोध केला आहे.