वक्फ कायदा देशविघातक असून हा विषय संसदेत मांडणार ! – उन्मेष पाटील, खासदार, भाजप, जळगाव

जळगाव, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – भाजप उपशहर प्रमुख श्री. विवेक ठाकूर, हिंदुत्वनिष्ठ श्री. जगदीश ठाकूर, श्री. प्रकाश पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनोद शिंदे यांच्यासह स्थानिक धर्मप्रेमी बांधव यांनी ४ नोव्हेंबर या दिवशी भाजपचे खासदार उन्मेष पाटील यांची एरंडोल (जिल्हा जळगाव) येथे भेट घेतली. या वेळी वक्फचा कायदा रहित करणे, ऐतिहासिक पांडववाड्याचा विषय मार्गी लावणे यांसह स्थानिक विषयांवर निवेदन देण्यात आले. ‘वक्फ कायदा देशविघातक असून मी पत्रव्यवहार करून हा विषय केंद्र सरकारपर्यंत पोचवतो, तसेच संसदेमध्येही हा विषय घेण्याचा प्रयत्न करतो. पांडववाड्याचाही विषय मार्गी लावतो’, अशी आश्वासने त्यांनी या वेळी दिली.