बाणगंगेच्या महाआरतीचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा ! – प्रवीण कानविंदे, अध्यक्ष, गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट

मुंबई, ५ नोव्हेंबर (वार्ता.) – काशी आणि वाराणसी येथे ज्या पद्धतीने असंख्य दिवे लावून गंगेची आरती केली जाते. त्याचप्रमाणे बाणगंगा येथे त्रिपुरा पौणिमेला (७ नोव्हेंबर) सायंकाळी ६.३० वाजता महाआरती होणार आहे. या उत्सवाला विविध क्षेत्रातील असंख्य भाविक उपस्थित रहातात. या वेळी काशीला गंगेच्या किनारी आहोत, असा भाविकांना भास होतो. सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून हा कार्यक्रम स्वत:च्या डोळ्यांनी पहावा, असे आवाहन गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे यांनी केले आहे.

बाणगंगा सज्ज होते आहे महा आरती साठी आणि आमची तयारी जोमात सुरु आहे.. येताय ना?
७ नोव्हेंबर २०२२ – बाणगंगा, वाळकेश्वर – मुंबई
।। हर हर गंगे, नमामि गंगे ।।
।। हर हर गंगे, नमामि बाणगंगे ।।

छायाचित्र आणि चित्रीकरण स्पर्धेचे आयोजन !

बाणगंगेच्या महाआरतीचे छायाचित्र आणि चित्रीकरण स्पर्धेचे आयोजन गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट करून आयोजित करण्यात आले आहे. ही स्पर्धेत सर्वांना सहभागी होता येणार आहे. यामध्ये प्रथम ३ सर्वाेत्कृष्ट छायाचित्र आणि ध्वनीचित्र  यांना १५ सहस्र, १० सहस्र आणि ५ सहस्र रुपयांचे पारितोषिक, तसेच महाराष्ट्र पर्यटन विभाग आणि गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्ट यांच्याकडून प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

(चित्रावर क्लिक करा)

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ ह्यांचा बाणगंगा महाआरती साठी सर्व भाविकांना निमंत्रित करणारे हे खास आवाहन
७ नोव्हेंबर २०२२ – बाणगंगा, वाळकेश्वर – मुंबई

 

ही छायाचित्र आणि चित्रीकरण ‘#BangangaMahaAarti2022’ यावर ‘ट्वीट’, तसेच  ‘@BangangaMahaAarti’ या फेसबूक आणि इस्टाग्राम माध्यमांवर ‘अपलोड’ करावयाची आहेत, अशी माहिती गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. ऋत्विक औरंगाबादकर यांनी दिली.


गौड सारस्वत ब्राह्मण टेंपल ट्रस्टचे अध्यक्ष श्री. प्रवीण कानविंदे यांनी केलेले आवाहन –

_________________________________________