मुंबईत पदपथावरून १ वर्षाच्या मुलीला पळवणारी महिला गजाआड

(प्रतिकात्मक चित्र)

मुंबई – सांताक्रूझ येथून आईजवळ झोपलेल्या १ वर्षाच्या मुलीला पळवणार्‍या टोळीतील महिलेला मुंबई पोलिसांनी सोलापूर येथून कह्यात घेऊन अटक केली. आईने मुलीला तिच्या शरिराला बांधून झोपवले होते. मुलगी पळवणार्‍या महिलेने त्यातून सोडवून मुलीला पळवले.

( सौजन्य : Zee 24 Taas)

सीसीटीव्ही कॅमेर्‍यातील चित्रणावरून तिचे छायाचित्र काढून परिसरात लावण्यात आले होते. काही लोकांना दाखवल्यावर त्यांनी या महिलेला ओळखले होते. भ्रमणभाषच्या स्थानावरून ती तेलंगणा येथे गेल्याचे लक्षात आले. त्यानंतर ती सोलापूर येथे येत असल्याचे कळले. सोलापूर येथे आल्यावर पोलिसांनी तिला लगेच अटक केली. मुलीला विकण्यासाठी तेलंगाणा येथे गेली होती; परंतु करार रहित झाल्याने ती परत सोलापूर येथे आली. रेल्वे स्थानकाचे पोलीस पथक आणि मुंबई गुन्हे शाखा यांनी मिळून ही कारवाई केली.