(म्हणे) ‘तिरंगा देशाचा ध्वज असतांना तो घरांवर का फडकावावा ?’

ज्यांचे तिरंगा, हा देश आणि येथील माती, यांच्यावर प्रेम नाही, ते असेच प्रश्‍न उपस्थित करणार ! अशा विधानांतून ते किती देशभक्त आहेत, हे लक्षात येते !

न्यायनिवाडा होईपर्यंत पक्षचिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नका !  

सर्वोच्च न्यायालयातील याचिकांवर निर्णय येईपर्यंत शिवसेनेकडेच ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह रहाणार आहे. या निर्णयामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना न्यायालयाकडून तूर्त दिलासा मिळाला आहे.

आसाममध्ये आतापर्यंत ८०० मदरसे बंद केले ! – मुख्यमंत्री सरमा

अन्य भाजपशासित राज्यांतील सरकारांनीही अशा प्रकारची कारवाई करणे अपेक्षित !

प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा, असे कार्य करा ! – खासदार गिर्ट विल्डर्स

माझ्या प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा असे कार्य करा, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी ऑफ फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गिर्ट विल्डर्स यांनी केले आहे.

५ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरातील सरकारी स्मारके आणि संग्राहलये येथे विनामूल्य प्रवेश !

भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्‍वभूमीवर ५ ते १५ ऑगस्ट या कालावधीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत येणारी देशभरातील सर्व स्मारके, संग्रहालये आणि पुरातत्व स्थळे येथे नागरिकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे.

वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेऊनही कोरोना होणे, हे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे अपयश ! – योगऋषी रामदेवबाबा

वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेऊनही जर कोरोनाचा संसर्ग होत असेल, तर हे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे अपयश आहे, असे विधान योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले. ते एका आंतरराष्ट्रीय संमेलनात बोलत होते.

राजस्थान येथे पोलीस हवालदाराला लाच घेतांना रंगेहात पकडले

भ्रष्टाचारग्रस्त पोलीस दल ! सरकारने या कृत्यात सहभागी दोषी पोलिसांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात ‘छी-थू’ होईल, असे केले पाहिजे, तरच इतरांवर वचक बसेल !

राहुल गांधी यांनी घेतली लिंगायत समुदायाची दीक्षा !

निवडणुका आल्यावर राहुल गांधी यांना हमखास धार्मिकता आठवते, हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे ! तथापि जनतेलाही काँग्रेसचे खरे स्वरूप माहीत असल्यानेच काँग्रेसने धार्मिकतेचा कितीही आव आणला, तरी जनता काँग्रेसला निवडून देणार नाही, हेही तितकेच सत्य आहे !

बरेली (उत्तरप्रदेश) येथे ख्रिस्ती शाळेत मेंदी लावून गेलेल्या साडेतीन वर्षांच्या मुलीला शिक्षकांनी केली शिक्षा !

ॲलर्जीच्या नावाखाली हिंदूंच्या परंपरांचा विरोध करण्याची ही ख्रिस्ती मिशनरींच्या शाळांची पद्धत आहे, हे न समजायला हिंदू दूधखुळे नाहीत !

केरळमध्ये जिलेटिनच्या ८ सहस्र कांड्या जप्त !

एवढ्या मोठ्या प्रमाणात स्फोटके नेमकी कोणत्या कारणासाठी वापरली जाणार होती ? ती अशी बेवारस ठेवण्यामागे काय उद्देश आहे, याचेही अन्वेषण होणे आवश्यक !