५ ते १५ ऑगस्ट या कालावधीत देशभरातील सरकारी स्मारके आणि संग्राहलये येथे विनामूल्य प्रवेश !

‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत केंद्रशासनाचा निर्णय

ताज महाल आणि लाल किल्ला

नवी देहली – भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होण्याच्या पार्श्‍वभूमीवर ५ ते १५ ऑगस्ट या कालावधीत भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाच्या अंतर्गत येणारी देशभरातील सर्व स्मारके, संग्रहालये आणि पुरातत्व स्थळे येथे नागरिकांना विनामूल्य प्रवेश मिळणार आहे. ‘आजादी का अमृत महोत्सव’ या कार्यक्रमाच्या अंतर्गत केंद्रशासनाने ही घोषणा केली.

देशभरात ‘हर घर तिरंगा अभियान’ चालू करण्यात आले आहे. यांतर्गत प्रत्येक नागरिकाला त्याच्या घरावर राष्ट्रध्वज फडकावण्याची अनुमती देण्यात आली आहे. यासह नागरिकांनी सामाजिक माध्यमांवरील त्यांच्या ‘डीपी’वरही (‘डिस्प्ले पिक्चर’ अर्थात् सामाजिक माध्यमांवरील स्वत:ची ओळख दर्शवणारे छायाचित्र) राष्ट्रध्वजाचे छायाचित्र लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.