(म्हणे) ‘तिरंगा देशाचा ध्वज असतांना तो घरांवर का फडकावावा ?’

समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांचा ‘हर घर तिरंगा’ अभियानाला विरोध !

ये मुल्क का झंडा, संविधान में कंपल्सरी नहीं, हर घर पर क्यों फहराएं… SP MP शफीकुर्रहमान

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने केंद्रशासन २ ते १५ ऑगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ हे अभियान राबवत आहे. सरकारने देशातील प्रत्येक घरावर तिरंगा लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याला उत्तरप्रदेशातील समाजवादी पक्षाचे खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी विरोध केला आहे.

 (सौजन्य : News18 UP Uttarakhand) 

ते म्हणाले , ‘‘हा देशाचा ध्वज आहे. या देशाचे नागरिक तो फडकावतात; मग हा घरांवर का लावावा ? भाजपवाले तर आम्हाला या देशातील मानतच नाहीत. ज्याची इच्छा असेल, तो हा ध्वज घरावर लावेल. ध्वज लावल्यानेच देशभक्ती सिद्ध होणार आहे का ?’’

खासदार बर्क पुढे म्हणाले की, राजघटनेत असे करणे अनिवार्य नाही; मग अशा अभियानाची आवश्यकताच काय आहे ? भाजपचे प्रत्येक अभियान आणि धोरण यांतून पक्षाचा प्रचार केला जात आहे.

संपादकीय भूमिका

ज्यांचे तिरंगा, हा देश आणि येथील माती, यांच्यावर प्रेम नाही, ते असेच प्रश्‍न उपस्थित करणार ! अशा विधानांतून ते किती देशभक्त आहेत, हे लक्षात येते !