स्थानांतरासाठी आंदोलन करणार्‍या काश्मिरी हिंदु कर्मचार्‍यांचे वेतन बंद !

सरकारने काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करून हिंदूंसाठी भयमुक्त आणि सुरक्षित वातावरण निर्माण केल्यास हिंदूंना असे आंदोलन करावे लागणार नाही ! सरकारने त्यासाठी पावले उचलावीत !

श्रीलंकेकडून पाकच्या युद्धनौकेला त्याच्या बंदरावर मुक्काम करण्याची अनुमती

श्रीलंकेची स्थिती अत्यंत दयनीय असतांना भारत त्याला सर्वप्रकारचे साहाय्य करत असूनही त्याची भारतविरोधी मानसिकता अद्याप नष्ट झालेली नाही, हेच या घटनेतून दिसून येते ! भारताने याविषयी श्रीलंकेला जाब विचारला पाहिजे आणि त्याला देण्यात येणारे साहाय्य बंद केले पाहिजे !

देशातील निवडक नागरिकांनाच राज्यघटनेने दिलेल्या अधिकारांची माहिती असणे, हे दुर्दैवी ! – सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा

लोकांना ‘राज्यघटना काय म्हणते ? आणि कायद्यांतर्गत कसे अधिकार आहेत ?, ते वापरायचे कसे ?’, याची माहिती नाही. आपली कर्तव्ये काय आहेत ?, हेही ठाऊक नाही, हे दुर्दैवी आहे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एन्.व्ही. रमणा यांनी व्यक्त केले.

राजधानी देहलीत पुन्हा ‘मास्क’ची सक्ती !

राजधानीत कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी केजरीवाल सरकारने पुन्हा मुखपट्टी वापरणे (मास्क वापरणे) सक्तीचे केले आहे.

महाराष्ट्र पोलीस दलातील २९ सहस्र ४०१ पदे रिक्त !

पदे रिक्त असल्याने अन्य कर्मचार्‍यांवर कामाचा अतिरिक्त ताण येतो आणि कामेही प्रलंबित रहातात. राज्यातील गुन्ह्यांची संख्या पहाता पोलीस दलातील पदे तातडीने भरणे आवश्यक आहे.

मनुस्मृतीसारख्या धर्मग्रंथांमध्ये स्त्रियांना मानाचे स्थान ! – न्यायमूर्ती प्रतिभा सिंह

एका न्यायमूर्तीपदावरील महिलेने ‘मनुस्मृतीमध्ये महिलेला आदराचे स्थान दिले आहे’, असे सांगितल्यामुळे त्यावर बंदी घालण्याची मागणी करणार्‍या स्त्रमुक्तीवाल्यांना मिर्च्या झोंबणे साहजिक आहे !

भारतात घुसखोरी करणार्‍या दोघा पाकिस्तानी नागरिकांना अटक

त्यांच्याकडून २ भ्रमणभाष संच, ओळखपत्र आणि पाकिस्तानी रुपये जप्त करण्यात आले.

रहाण्यास योग्य आणि अयोग्य देशांच्या सूचीमधील पहिल्या १० शहरांमध्ये भारतातील एकाही शहराचा समावेश नाही !

जगभरातील १७२ शहरांचा अभ्यास केल्यानंतर ‘इकोनॉम्सिट इंटेलिजेंस युनिट’ या संस्थेने जगातील रहाण्याच्या दृष्टीने योग्य आणि अयोग्य शहरांची सूची घोषित केली आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराचे सरकारीकरण रहित करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका करणार ! – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी, भाजप

या वेळी ‘डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांना आम्ही पंढरपूर येथे येण्याचे निमंत्रण दिले असून त्यांनी ते स्वीकारले आहे’, असे देवव्रत राणा महाराज वास्कर यांनी सांगितले.

नूपुर शर्मा यांच्या विरोधातील सर्व खटले देहलीत वर्ग ! – सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

यासमवेतच प्रकरणाचे अन्वेषण पूर्ण होईपर्यंत शर्मा यांना अटकेपासून संरक्षणही देण्यात आले आहे. शर्मा यांच्या जिवाला धोका असल्याने हा आदेश देण्यात आला.