वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेऊनही कोरोना होणे, हे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे अपयश ! – योगऋषी रामदेवबाबा

वैद्यकीय विज्ञान बाल्यावस्थेत असल्याचेही प्रतिपादन

हरिद्वार (उत्तराखंड) – वर्धक मात्रा (बूस्टर डोस) घेऊनही जर कोरोनाचा संसर्ग होत असेल, तर हे आधुनिक वैद्यकीय विज्ञानाचे अपयश आहे, असे विधान योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले. ते एका आंतरराष्ट्रीय संमेलनात बोलत होते.

ते पुढे म्हणाले की, वैद्यकीय विज्ञान बाल्यावस्थेत आहे. वर्धक मात्रा घेऊनही लोकांना कोरोना होत आहे. त्यामुळे लोकांना नैसर्गिक जीवनपद्धती अवलंबवावी लागेल. पालटत्या काळानुसार जगभरात लोक पुन्हा आयुर्वेदाकडे वळतील. गुळवेलवर संशोधन करून औषधे बनवली, तर भारत जगातील सर्वांत मोठी आर्थिक शक्ती बनू शकतो.