स्वातंत्र्याच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रहितासाठी समर्पित होऊन कार्य करा !

फाळणीच्या वेळी हिंदू आणि भारतीय यांनी असंख्य कष्ट सहन केले. त्यांच्यामुळेच आज भारत संपूर्ण विश्‍वात नावारूपाला येत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण सर्वांनी शपथ घेऊया की, भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवूया.

गुंतवणूक क्षेत्रातील तज्ञ राकेश झुनझुनवाला यांचे निधन

गुंतवणूक क्षेत्रातील तज्ञ आणि ‘शेअर बाजाराचे राजा’ म्हणून ओळखले जाणारे राकेश झुनझुनवाला (वय ६२ वर्षे) यांचे १४ ऑगस्टला निधन झाले.

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

शिवसंग्राम पक्षाचे अध्यक्ष आणि माजी आमदार विनायक मेटे (वय ५२ वर्षे) यांच्या गाडीला १४ ऑगस्ट या दिवशी पहाटे ५ वाजता झालेल्या भीषण अपघातात त्यांचे निधन झाले.

सलमान रश्दी यांनी ‘सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तक लिहिल्यामुळेच त्यांच्यावर आक्रमण ! – लेखिका तस्लिमा नसरीन

प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर अमेरिकेतील २४ वर्षीय इराणी-अमेरिकन हादी मातर याने आक्रमण केले.

सालेम (तमिळनाडू) शहरातील श्री वेणुगोपाल कृष्णस्वामी मंदिराच्या जागेवरील अतिक्रमण हटवा ! – मद्रास उच्च न्यायालय

सालेममधील कन्ननकुरिची येथील ए राधाकृष्णन् यांनी मंदिराच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाच्या विरोधात याचिका प्रविष्ट केली होती.

राजस्थान येथे पाकसाठी हेरगिरी करणार्‍या दोघा हिंदूंना अटक

अशांवर जलद गती न्यायालयाला खटला चालवून त्यांना फाशीचीच शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न केला पाहिजे !

कानपूर येथून जैश-ए-महंमदच्या आतंकवाद्याला अटक  

जिहादी आतंकवाद्यांनी पोखरलेला भारत ! अशांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे !

घाबरणे सोडा; आपण दुर्बलतेचे उपासक नाही ! – सरसंघचालक डॉ. मोहन भागवत

आपण आपले ज्ञान आधीच विसरलो आणि नंतर परकीय आक्रमकांनी आपल्या भूमीवर नियंत्रण मिळवले. विनाकारण आपल्यात भेद निर्माण करण्यासाठी जातीपातीची दरी निर्माण करण्यात आली.

‘हर घर तिरंगा’ अभियानाला देशभरात अभूतपूर्व प्रतिसाद !

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्रशासनाकडून १३ ते १५ ऑगस्ट या काळात ‘हर घर तिरंगा’ या अभियानास प्रारंभ करण्यात आला आहे. या अभियानानुसार देशातील प्रत्येक घरावर तिरंगा फडकावण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सलमान रश्दी यांच्यानंतर आता ‘हॅरी पॉटर’ पुस्तकाच्या लेखिका जे.के. रोलिंग यांना ठार मारण्याची धमकी

ज्या ट्विटर खात्यावरून रोलिंग यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आली आहे, त्याच खात्यावरून रश्दी यांच्यावर आक्रमण करणारा हादी मातर याचे कौतुक करण्यात आले आहे.