आसाममध्ये आतापर्यंत ८०० मदरसे बंद केले ! – मुख्यमंत्री सरमा

आसाममध्ये आतंकवादी मुस्तफा याच्या मदरशावर बुलडोझर फिरवला !

गौहत्ती (आसाम) – भाजपशासित उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश यांच्या धर्तीवर आसाममध्येही माफिया, आतंकवादी आणि अन्य गुन्हेगार यांची अवैध बांधकामे पाडण्याची प्रक्रिया गतीमान करण्यात आली आहे. आसाममधील मोरीगाव जिल्ह्यात आतंकवादी मुस्तफा उपाख्य मुफ्ती मुस्तफा चालवत असलेला ‘जमीउल हुदा’ हा मदरसा बुलडोझरच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आला. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सरमा यांनी सांगितले की, सरकारने आधीच राज्यातील ८०० सरकारी मदरसे बंद केले आहेत. आसाम इस्लामिक कट्टरवाद्यांचे आश्रयस्थान बनत चालला आहे.

मुस्तफाचा हा मदरसा मोईराबारी परिसरात होता. त्याला बांगलादेशस्थित आतंकवादी संघटना ‘अन्सारुल्ला बांग्ला टीम’  आणि ‘अल् कायदा’ यांच्याशी संबंध ठेवल्यासाठी काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती, असे मोरीगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक अपर्णा एन्. यांनी सांगितले.

यापूर्वी १२ जुलै या दिवशी आसाममधील दिब्रुगड जिल्हा प्रशासनाने कार्यकर्ता विनित बगरिया यांना आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या बैदुल्ला खान यांच्या घरावर बुलडोझर फिरवला होता

संपादकीय भूमिका

अन्य भाजपशासित राज्यांतील सरकारांनीही अशा प्रकारची कारवाई करणे अपेक्षित !