प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा, असे कार्य करा ! – खासदार गिर्ट विल्डर्स

खासदार गिर्ट विल्डर्स

ॲमस्टरडॅम (नेदरलँडस्) – हे (नुपूर शर्मा प्रकरणानंतर निर्माण झालेली स्थिती) केवळ शूर नुपूर शर्मा यांच्याविषयी नाही, तर हिंदु धर्माचे अस्तित्व, भाजपचा सन्मान, कायद्याचे नियम, महंमद यांच्याविषयीच्या सत्याची भीती, जमावाची हिंसा आणि मुसलमानांविषयीविषयी दुटप्पीपणा यांविषयी आहे. माझ्या प्रिय हिंदू मित्रांनो, जागे व्हा आणि भारताला पुन्हा अभिमान वाटावा असे कार्य करा, असे ट्वीट नेदरलँड्स येथील ‘पार्टी ऑफ फ्रिडम’ पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार गिर्ट विल्डर्स यांनी केले आहे.