अडीच वर्षांच्या कालावधीत महाविकास आघाडी सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद, भाजप

अडीच वर्षांच्या कालावधीत महिलांचे प्रश्न, बेरोजगारी, शेतकर्‍यांच्या समस्या यांसह सर्वच आघाड्यांवर  महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरलेले आहे. या सरकारला सर्वसामान्यांच्या प्रश्नांकडे पहाण्यास वेळ नसून हे सरकार स्थानांतरण आणि वसुली यातच मग्न आहे…

सातारा येथे ‘हिंदू एकता दिंडी’द्वारे हिंदु राष्ट्र स्थापनेचा निग्रह !

छत्रपती शिवराय आणि राष्ट्रगुरु समर्थ रामदासस्वामी यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक सातारा नगरीमध्ये २४ मे या दिवशी ‘हिंदू एकता दिंडी’ चैतन्यमय वातावरणात पार पडली.

१३ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम निवडणूक आयोगाकडून घोषित !

महापालिकांची आरक्षणाची सोडत ३१ मे या दिवशी काढण्यात येणार आहे, अशी घोषणा राज्याच्या निवडणूक आयोगाने केली आहे. मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरारसह राज्यातील १३ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा आरक्षण सोडत कार्यक्रम होणार आहे

प्रतीक्षा दाऊदच्या मुसक्या आवळण्याची !

मुंबईतील बाँबस्फोटांना २० वर्षे होत आली आहेत. त्यातील गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी देशाला आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार आहे ? लादेनला पाकिस्तानमध्ये घुसून मारण्यासाठी अमेरिकेने पाकिस्तानची अनुमती घेतली नव्हती. आताच्या शासनानेही राष्ट्रहिताची पावले उचलावीत, अशी भारतियांना अपेक्षा आहे !

पुणे येथील धर्मांध भोंदूबाबाकडून महिलेची ९ लाख २५ सहस्र रुपयांची फसवणूक !

‘भूमीतून धन काढून देतो’, असे सांगून वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील महिलेची ९ लाख २५ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आळे (ता. जुन्नर) येथील अब्दुल सलाम इनामदार या भोंदूबाबावर गुन्हा नोंद केला आहे.

गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून पोलीस पाटलाची हत्या !

‘आणखी किती हत्या केल्यावर नक्षलवादाच्या विरोधात कारवाई होणार ?’, हे शासनकर्त्यांनी सांगावे !

नाशिक येथे पेट्रोलपंपांवर पेट्रोलची कृत्रिम टंचाई !

केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोल ९.५० रुपये, तर डिझेल ७ रुपयांनी प्रतिलिटरमागे स्वस्त केले. याचा थेट लाभ ग्राहकांना होणार असून पेट्रोलियम आस्थापनांची लिटरमागे १५ ते २५ रुपयांची हानी होत आहे. यामुळे आस्थापनांनी इंधन पुरवठ्यासाठी हात आखडता घेतला आहे

‘सी.एम्.पी.’ प्रणालीद्वारे एका ‘क्लिक’वर मासाच्या १ तारखेला शिक्षकांना मिळणार वेतन !

जिल्ह्यातील ९ सहस्र ४३३ प्राथमिक शिक्षकांचे ‘सी.एम्.पी.’ प्रणालीद्वारे वेतन जमा होणार आहे. राज्यात शिक्षकांना वेळेत वेतन देणारी सोलापूर जिल्हा परिषद अग्रणी आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

लाच स्वीकारतांना बारामती (पुणे) येथील हवालदार आणि होमगार्ड यांना अटक !

अटक नोटिसीमध्ये (वॉरंट) अटक न करण्यासाठी आरोपीकडून लाच स्वीकारतांना बारामती शहर पोलीस ठाण्यातील हवालदार अण्णासाहेब उगले आणि होमगार्ड सनी गावडे या दोघांना अटक करण्यात आली आहे.

लोकसहभागातून सांगली महापालिकेत ‘मॉडेल स्कूल अभियान’ ! – नितीन कापडणीस, आयुक्त, सांगली, मिरज आणि कुपवाड

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका, तसेच ‘आभाळमाया फाऊंडेशन’ यांच्या वतीने लोकसहभागातून ‘मॉडेल स्कूल अभियान’ राबवण्यात येणार आहे. यासाठी मिरज शहरातील क्रमांक १९ या शाळेची निवड करण्यात आली आहे.