नाशिक येथे पेट्रोलपंपांवर पेट्रोलची कृत्रिम टंचाई !

प्रतिकात्मक छायाचित्र.

नाशिक – केंद्र सरकारने उत्पादन शुल्कात कपात करत पेट्रोल ९.५० रुपये, तर डिझेल ७ रुपयांनी प्रतिलिटरमागे स्वस्त केले. याचा थेट लाभ ग्राहकांना होणार असून पेट्रोलियम आस्थापनांची लिटरमागे १५ ते २५ रुपयांची हानी होत आहे. यामुळे आस्थापनांनी इंधन पुरवठ्यासाठी हात आखडता घेतला आहे. परिणामी जिल्ह्यात २२ मेपासून अनेक पंपांवर ‘इंधन शिल्लक नाही’, असे फलक लावण्यात आले आहेत. शुल्क अल्प झाल्याचा फटका पेट्रोल पुरवठादारांना अधिक बसल्याने जिल्ह्यातील त्यांची एकत्रित हानी १० कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे. इंधनाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने अनेक पेट्रोलपंप बंद दिसत आहेत. ग्रामीण भागात याची संख्या अधिक असून पंपांवर रांगा लागत आहेत.