हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना अभिवादन !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या तिथीनुसार असणार्‍या जयंतीनिमित्त (२१ मे) दादर येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने सावरकरांना अभिवादन करण्यात आले.

राज्यात ३२ लाख वीज ग्राहकांकडे ६ सहस्र कोटी रुपयांची थकबाकी !

वीज ग्राहकांकडे सहस्रो कोटी रुपयांची थकबाकी ठेवणार्‍या‘महावितरण’च्या अधिकार्‍यांकडूनच वसुली केली पाहिजे !

श्री तुळजाभवानीदेवीच्या अभिषेक पूजेस २ वर्षांनंतर प्रारंभ !

महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीदेवीची अभिषेक पूजा चालू करण्याचा निर्णय मंदिर संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या वतीने घेण्यात आला. कोरोनाच्या निर्बंधामुळे २ वर्षांपासून ही पूजा बंद होती.

‘हिंदू एकता दिंडी’ने अमरावती येथे चेतवले हिंदुत्वाचे स्फुलिंग !

सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत बाळाजी आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त सनातन संस्थेच्या वतीने काढण्यात आलेल्या हिंदू एकता दिंडीमुळे शहरात वीरश्री निर्माण होऊन सर्वांमध्ये वेगळाच उत्साह संचारला होता.

सरकारने ‘ॲट्रॉसिटी’ कायदा रहित करावा ! – अजयसिंह सेंगर, प्रमुख, करणी सेना, महाराष्ट्र राज्य

श्री. सेंगर पुढे म्हणाले, ‘‘ॲट्रॉसिटी कायद्यामुळे जातीजातींमध्ये फूट पडली आहे. सरकार एकीकडे ‘जातीयवाद निर्माण करू नका’, असे आवाहन करते आणि दुसरीकडे ठराविक जातींसाठी वेगळे कायदे बनवते.

कोरोनाच्या चौथ्या लाटेची शक्यता नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री

कोरोनाच्या आजारात बरे झालेले रुग्ण ९८ टक्क्यांपेक्षा अधिक आहेत. राज्यात कोरोनाच्या चौथ्या लाटेच्या चर्चेत आता काही तथ्य वाटत नाही, असे स्पष्ट मत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले.

कोल्हापूरचे संजय पवार यांना शिवसेनेकडून राज्यसभेसाठी उमेदवारी !

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या वतीने कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख श्री. संजय पवार यांच्या नावाची घोषणा शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मुंबई येथून केली आहे. संजय पवार हे कोल्हापूरचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.

पेंटाग्राफमधील ‘स्पार्क’मुळे हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत !

पावसाच्या हलक्या सरींमुळे हार्बर मार्गावर पेंटाग्राफमध्ये ‘स्पार्क’ झाल्याने २४ मे या दिवशी सकाळी लोकल वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

सर्व हिंदू संघटित झाल्यास ईश्वरी राज्य येईल ! – पू. भागिरथी महाराज, संस्थापक अध्यक्ष, गुरुकृपा सेवाश्रम

हिंदूंच्या संघटनाअभावी हिंदूंवर आघात होत आहेत. त्यामुळे जेव्हा सर्व जण हिंदू म्हणून संघटित होतील, तेव्हाच ईश्वरी राज्य येईल, असे प्रतिपादन बेलतरोडीच्या गुरुकृपा सेवाश्रमाचे संस्थापक अध्यक्ष पू. भागिरथी महाराज यांनी केले.

बैठकीत आरक्षणाचा मुद्दा निघालाच नाही ! – ब्राह्मण महासंघाचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत ‘ब्राह्मणांना आरक्षण हवे’, हे सूत्रच आले नाही. यासंबंधी सर्व ठिकाणी विपर्यस्त वृत्त प्रसिद्ध झाले आहे. ‘कुणालाच आरक्षण नको’, अशी काही जणांची भूमिका होती…