गडचिरोली येथे नक्षलवाद्यांकडून पोलीस पाटलाची हत्या !

प्रतिकात्मक छायाचित्र

गडचिरोली – येथील नक्षलवादग्रस्त भागातील एटापल्ली तालुक्यात असलेल्या डोद्दूर गावचे पोलीस पाटील कुल्ले वंजा कोवासी यांची नक्षलवाद्यांनी २३ मेच्या रात्री ९ वाजता हत्या केली. नक्षलवाद्यांनी भामरागड आणि एटापल्ली या तालुक्यांत प्रचंड धुमाकूळ घातला आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी रस्त्यांच्या कामावरील वाहनेही जाळली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ४० ते ५० नक्षलवाद्यांनी पोलीस पाटलांना पुष्कळ मारहाण केली. नंतर त्यांना गोळ्या मारून ठार करण्यात आले. नक्षलवाद्यांनी त्यांचा मृतदेह रस्त्यावर आणून ठेवला. पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयावरून त्यांची हत्या झाल्याची चर्चा आहे.

संपादकीय भूमिका

‘आणखी किती हत्या केल्यावर नक्षलवादाच्या विरोधात कारवाई होणार ?’, हे शासनकर्त्यांनी सांगावे !