पुणे – ‘भूमीतून धन काढून देतो’, असे सांगून वारूळवाडी (ता. जुन्नर) येथील महिलेची ९ लाख २५ सहस्र रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी आळे (ता. जुन्नर) येथील अब्दुल सलाम इनामदार या भोंदूबाबावर गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी निर्मला नारायणकर या महिलेने तक्रार दिली आहे.
फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नारायणकर यांनी भोंदूबाबाकडे घेतलेले पैसे परत मागितले, तर जिवे मारण्याची आणि घराला आग लावून पेटवून देण्याची धमकी भोंदूबाबा इनामदार यांनी महिलेला दिली होती.
संपादकीय भूमिकागुन्हेगारीत आघाडीवर असलेले धर्मांध देशासाठी घातक. अशा धर्मांधांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! |