उज्जैन येथील मशिदीखाली शिवमंदिर ! – महामंडलेश्‍वर अतुलेशानंद

उज्जैन येथील दानी गेट येथे असणार्‍या मशिदीच्या खाली भगवान शिवाचे मंदिर आणि श्रीगणेशाची मूर्ती आहे, असा दावा ‘आवाहन’ आखाड्याचे महामंडलेश्‍वर आणि ‘अखंड हिंदु  सेने’चे राष्ट्रीय अध्यक्ष अतुलेशानंद यांनी केला.

विजेचे ‘प्रिपेड मीटर’ बसवण्याची गोवा शासनाची संकल्पना

विजेची देयके देण्यास विलंब होतो. ‘मीटर रिडर’ना निवडणुका किंवा आपत्ती व्यवस्थापनाचे काम दिल्याने विजेची देयके उशिरा देण्यात येतात, असे लक्षात आले आहे. यावर उपाययोजना म्हणून हे विजेचे ‘प्रिपेड मीटर’ !

वन खात्याकडून भरमसाठ शुल्क आकारणीमुळे गोव्यात पर्यटकांची नेत्रावळी अभयारण्य पर्यटनस्थळाकडे पाठ !  

वन खात्याने शुल्क अल्प केले आहे; पण पुन्हा पर्यटकांची रेलचेल वाढण्यासाठी वन खात्याने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.

रत्नागिरीत आंबा व्यावसायिकांची जिल्हाधिकार्‍यांना निवेदनाद्वारे मागणी

काही बागायतदारांचे रातोरात १० ते ३० ‘क्रेट’ आंबा चोरी झालेले आहेत. बहुतांशी हापूस आंबा खरेदी विक्री केंद्रे ही अनधिकृत आहेत. या केंद्रांनी कृषी खात्यांकडून किंवा अन्य संबंधित खात्यांकडून परवानाही घेतलेला नसतो.

वारकर्‍यांनी धर्मरक्षणासाठी समाजप्रबोधन करण्याची आवश्यकता ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

गोहत्या, लव्ह जिहाद, हलाल जिहाद अशी विविध संकटे आज हिंदु समाजावर घोंगावत आहेत. याविषयी प्रत्येक हिंदूला जागृत करणे आवश्यक आहे आणि ते सामर्थ्य वारकर्‍यांमध्ये आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘राजकारणी, बुद्धीप्रामाण्यवादी किंवा वैज्ञानिक यांच्यामुळे विदेशी भारतात येत नाहीत, तर संतांमुळे, तसेच अध्यात्म आणि साधना शिकण्यासाठी येतात. तरीही हिंदूंना संत अन् अध्यात्म यांचे मूल्य कळलेले नाही.’

मांघर (जिल्हा सातारा) हे देशातील पहिले मधाचे गाव होणार ! – सुभाष देसाई, उद्योगमंत्री

सातारा जिल्ह्यातील मांघर येथे ‘मधाचे गाव’ ही संकल्पना राबवण्यात येणार आहे. या उपक्रमातून मधुपालनाला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. राज्यशासनाच्या राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्या वतीने १६ मे या दिवशी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ केला जाणार आहे.

हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा राज्य संघटक श्री. मनोज खाडये यांचा गुजरात संपर्क दौरा

या वेळी श्री. खाडये यांनी उद्योजक, संपादक, शिक्षण क्षेत्रातील प्रतिष्ठित, धर्मप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ आदींच्या भेटी घेतल्या.

देशातील सर्व समस्यांच्या उपायांसाठी हिंदु राष्ट्र आवश्यक ! – प्रशांत वैती, हिंदु जनजागृती समिती

भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्यानंतरच देशातील सर्व समस्यांचे निराकरण होऊ शकते. यासाठी सर्व हिंदूंनी धर्माचरण आणि साधना केली पाहिजे.