तळोजा (पनवेल) – येथील सिडको गृहनिर्माण वसाहतीमधील फेज २ मधील चौकाचे ‘सुभेदार तानाजी मालुसरे, चौक’ असे नामकरण येथील फेज १ आणि फेज २ येथील सकल हिंदु समाजाकडून करण्यात आले. या वेळी भाजपचे पनवेल तालुका सरचिटणीस प्रल्हाद केणी यांनी सर्वांना एकत्र येण्याचे आवाहन केले. तसेच ‘संकटप्रसंगी आम्ही तुमच्या पाठीशी राहू’, असे आश्वासन दिले.
या वेळी भाजपच्या युवा मोर्चाचे खजिनदार नितीन भोईर, तसेच नवनाथ भोजने, हनुमंत ढवळे, अजय नाईक, अशोक वीरकर, कुलदीप पवार, विजय पाटील, प्रशांत काळे, जयवंत माने, अनिकेत पाटील, गोरख शिंदे, सुमित गवांडे, बबन डोंगरे उपस्थित होते.
स्थानिक शिवप्रेमींनी या अगोदर येथील एका चौकाचे ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक’ असे नामकरण केले होते. तेथून तळोजा परिसरात पहिली दुर्गामाता दौड काढण्यात आली होती.