एल्.टी.टी.-जयनगर एक्सप्रेसचे काही डबे रुळावरून घसरले !

एकाचा मृत्यू

नाशिक – येथे एल्.टी.टी.-जयनगर एक्सप्रेसचे काही डबे ३ एप्रिल या दिवशी लहवित आणि देवळाली स्थानकांच्या दरम्यान दुपारी ३.१५ वाजता रूळावरून घसरले. मध्य रेल्वेच्या वतीने ट्वीट करून यासंदर्भातील माहिती देण्यात आली. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, दुपारी ३.१५ च्या सुमारास लहवित आणि देवळाली (नाशिकजवळ) दरम्यान 11061 एल्.टी.टी.-जयनगर एक्सप्रेसचे काही डबे रुळावरून घसरले. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून काही जण घायाळ झाले आहेत. एक्सप्रेसचे ४ – ५ डबे रुळावरून घसरले.