भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उंदरांचा उच्छाद !

भंडारा – सर्वसामान्य जनतेला उपचार आणि आरोग्यविषयक सेवा देणारे मुख्य केंद्र असलेल्या मुख्यालयातील भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात उंदरांचे प्रमाण पुष्कळ वाढले आहे. यामुळे इतर आजार वाढीस लागण्याची भीती रुग्णांच्या नातेवाइकांनी व्यक्त केली आहे. ‘उंदरांचा बंदोबस्त करावा’, अशी मागणी करण्यात येत आहे. (अशी मागणी का करावी लागते ? रुग्णालय प्रशासनाच्या हे लक्षात येत नाही का ? – संपादक)

१. रुग्णांच्या अंगावरून एकावेळी ८ ते १० उंदीर उड्या मारतात. रुग्णांच्या डब्यातील किंवा पिशव्यातील खाद्यपदार्थांचा फडशा पाडतात.

२. रुग्णासमवेत असणार्‍या एका व्यक्तीच्या पायाला उंदराने कडाडून चावा घेतला होता.

संपादकीय भूमिका

आरोग्य यंत्रणा झोपली आहे कि काय ? रुग्णालय प्रशासन उंदरांचा बंदोबस्त का करत नाही ? रुग्णांच्या आरोग्याशी खेळणार्‍या संबंधितांना कारागृहातच डांबायला हवे !