पुणे – मी ४ वेळा इ.व्ही.एम्.वर (इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) निवडून आले आहे. त्यामुळे ‘ इ.व्ही.एम्.’मध्ये घोटाळा आहे, असे मी कसे म्हणू ? अनेक ठिकाणी लोकांचे म्हणणे आहे की, त्यांची मते दुसरीकडे गेली आहेत. त्यामुळे सरकार पारदर्शीपणे काम करत असेल, तर इ.व्ही.एम्. काय किंवा ‘बॅलेट पेपर’वर (छापील मतपत्रिका) निवडणूक घेण्यास सरकारला अडचण काय आहे ? अशी विचारणा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. त्या बारामती तालुक्यातील विविध गावांच्या दौर्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतांना बोलत होत्या.
बारामती विधानसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार युगेंद्र पवार यांनी इ.व्ही.एम्.वर संशय व्यक्त केला होता. मी युगेंद्र पवार यांना ‘मत पडताळणी करू नका’, असे सांगितले होते. त्यांनी त्यांचा अर्ज मागे घेतला आहे.