पुणे – पुणे शहरातील पत्रकारिता आणि संप्रेषण क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व डॉ. किरण ठाकूर (वय ८० वर्षे) यांचे २८ डिसेंबर या दिवशी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष होते, तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापिठाच्या संज्ञापन आणि वृत्तपत्रविद्या विभागाचे निवृत्त विभागप्रमुख होते. त्यांच्या पश्चात पत्नी आणि २ मुले असा परिवार आहे. एम्.आय.टी. महाविद्यालयाचे प्राध्यापक नचिकेत ठाकूर आणि दूरचित्र वाहिन्यांवरील मालिकांचे निर्माते पार्थ हे त्यांचे पुत्र आहेत.
पुणे डेलीमध्ये उपसंपादक म्हणून आणि युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे (‘यू.एन्.आय.’चे) प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केले, तसेच इंडियन पोस्ट आणि द ऑब्झर्वर ऑफ बिझनेस अँड पॉलिटिक्स या नियतकालिकांसाठीही त्यांनी योगदान दिले. पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांचे नेहमीच आदराने स्मरण केले जाईल.