Prashant Kumar On Police Security : पोलीस अद्यापही प्रयागराजला रुजू झाले नाहीत !

  • प्रयागराज महाकुंभपर्व २०२५

  • पोलीस महासंचालकांकहून अप्रसन्नता व्यक्त

प्रयागराज – उत्तरप्रदेशचे पोलीस महासंचालक प्रशांत कुमार यांनी महाकुंभपर्वाच्या सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात ‘व्हिडिओ कॉन्फरन्सिंग’द्वारे अधिकार्‍यांची बैठक घेतली. या वेळी प्रशांत कुमार यांनी पोलीस अधिकारी आणि कर्मचारी हे कर्तव्यासाठी न पोचल्याविषयी, तसेच सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याच्या कामात होत असलेल्या विलंबाविषयी अप्रसन्नता व्यक्त केली.

महाकुंभपर्वात सुरक्षेच्या कारणास्तव प्रशांत कुमार यांनी नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा बला साहाय्याने व्यापक तपासणी मोहीम राबवण्याचे निर्देश दिले. यासह त्यांनी सर्व मुख्य चौक आणि ठिकाणे येथे अधिकाधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावून ते पोलीस नियंत्रण कक्षाशी जोडण्यास सांगितले.