मुंबई पोलिसांकडून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ६१ जणांना अटक

मुंबई पोलिसांनी सामाजिक माध्यमांतून (सोशल मिडिया) सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी आतापर्यंत ६१ जणांना अटक केली आहे. सध्याची सामाजिक परिस्थिती पहाता जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.

जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, असे वर्तन कुणीही करू नये ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

सर्व जाती धर्माच्या लोकांनी आपापले सण आनंदाने, उत्साहाने साजरे केले पाहिजेत. एकोप्याने राहिले पाहिजे. जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण होईल, असे वर्तन कुणाकडून होऊ नये, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

भोंग्यांची नियमावली निश्चित करण्यासाठी आज पोलीस महासंचालकांसमवेत होणार मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक !

न्यायालयाच्या निर्णयानंतरही कारवाई न झालेल्या भोंग्यांवर राज ठाकरे यांच्या चेतावणीनंतर कारवाई होण्याची शक्यता !

सत्सेवेतून पुष्कळ आनंद मिळतो आणि सेवा करतच रहावीशी वाटते ! – शिबिरार्थींचे मनोगत

शिबिरात मार्गदर्शन करतांना धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव म्हणाले, ‘‘योग्य साधना केल्यावर देव कसे साहाय्य करतो आणि आपल्या जीवनात कसे आमूलाग्र पालट होतात, हे प्रत्येकाने साधना सत्संगाच्या माध्यमातून अनुभवले.

ए.टी.एम्.मध्ये भरावयाचे ८२ लाख ५० सहस्र रुपये चोरणारा अटकेत !

पोलिसांनी पडताळणीअंती गाडीचा चालक आरोपी संदीप दळवी याला २४ घंट्यांत पनवेल बसस्थानक येथून अटक केली. त्याच्याकडून ८१ लाख ४१ सहस्र ८०० रुपये कह्यात घेण्यात आले.

अधिवक्ता सदावर्ते पुन्हा आर्थर रोड कारागृहात जाणार !

अधिवक्ता सदावर्ते यांची सातारा येथील पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना सातारा जिल्हा न्यायालयात उपस्थित करण्यात आले. दोन्ही पक्षाने न्यायालयासमोर युक्तिवाद केला.

काळम्मावाडी थेट पाणीवाहिनीचे काम जलदगतीने पूर्ण करा ! – सतेज पाटील, पालकमंत्री, कोल्हापूर

कोल्हापूर शहराच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या ‘काळम्मावाडी थेट पाणीवाहिनी योजने’च्या कामासाठी आवश्यकता भासल्यास अतिरिक्त मनुष्यबळ घ्या. रात्रंदिवस काम चालू ठेवा; पण हे काम जलदगतीने पूर्ण करा, अशा सूचना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या.

शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या !

आत्महत्येच्या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान !

‘आतंकवाद पोसल्यावर काय होते ?’, याचे हे उत्तम उदाहरण होय. ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’, असे म्हटले जाते. भारतासाठी तालिबान आणि पाकिस्तान हे एकाच माळेचे मणी आहेत. या दोघांनाही कुणी धडा शिकवत असेल, तर ते भारताला हवेच आहे आणि हे दोन्ही देश जर पुढे एकमेकांशी भांडत राहिले, तर तेही भारताला हवेच आहे !

घटनाद्रोही आदेश !

‘नाशिक येथे मनसेचा अधिक जोर असल्याने असे करण्यात आले आहे का ?’, असा प्रश्न उपस्थित होतो. स्वतःची अकार्यक्षमता लपवण्यासाठी नाशिक पोलीस हिंदूंनाच दाबण्याचा प्रयत्न याद्वारे करत आहेत. त्यामुळे हा अन्याय रोखण्यासाठी हिंदूंनी वैध मार्गाने विरोध करणे अपरिहार्यच आहे !