सातारा – अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते सदावर्ते यांना सातारा पोलिसांनी ४ दिवसांपूर्वी अटक केली होती. अधिवक्ता सदावर्ते यांची सातारा येथील पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना सातारा जिल्हा न्यायालयात उपस्थित करण्यात आले. दोन्ही पक्षाने न्यायालयासमोर युक्तिवाद केला. सरकार पक्षाने पुन्हा पोलीस कोठडी मागितली; मात्र न्यायालयाने बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून पोलीस कोठडी नाकारली. त्यामुळे सदावर्ते यांना सातारा पोलीस पुन्हा आर्थर रोड कारागृहात सोडणार आहेत.