मुंबई पोलिसांकडून सामाजिक तेढ निर्माण केल्याप्रकरणी ६१ जणांना अटक

३ सहस्र ‘पोस्ट’ काढल्या !

मुंबई – मुंबई पोलिसांनी सामाजिक माध्यमांतून (सोशल मिडिया) सामाजिक तेढ निर्माण केल्याच्या प्रकरणी आतापर्यंत ६१ जणांना अटक केली आहे. सध्याची सामाजिक परिस्थिती पहाता जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सामाजिक माध्यम (सोशल मिडिया) लॅब अधिक सक्रीय केली आहे. यामुळे सामाजिक तेढ निर्माण करण्यांना आता चाप बसणार आहे. पोलिसांनी अद्यापपर्यंत जातीय तेढ निर्माण करू शकणाऱ्या अनुमाने ३ सहस्र ‘पोस्ट’ सामाजिक माध्यमातून काढून टाकल्या (डिलिट केल्या) आहेत.

रामनवमीपासून महाराष्ट्रात काही ठिकाणी हिंसाचार उसळला होता. या प्रकरणी मुंबईत ६ गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. मानखुर्द, मालवणी आणि कुरार या पोलीस ठाण्यांत गुन्हा नोंद झाला आहे. तसेच गोरेगावच्या आरे कॉलनीत ३ स्वतंत्र गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून आतापर्यंत ६१ जणांना अटक करण्यात आली आहे.