मुंबई – शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नी रजनी कुडाळकर (वय ४२ वर्षे) यांनी कुर्ला-नेहरूनगर येथे रहात्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. १७ एप्रिल या दिवशी घरी सर्वजण असतांना रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. मंगेश कुडाळकर हे कुर्ला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार आहेत. आत्महत्येच्या प्रकरणी नेहरूनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप समोर येऊ शकले नाही.