गुरुदेवांची वैभवी लवकर पोचावी समष्टी संतपदी ।

ध्येयाच्या ध्यासाने वेडी झाली गुरुदेवांची वैभवी ।
गुरुभक्ती करण्या ती सतत धडपड करी ।।
राहून कार्यरत प्रत्येक क्षणी ।
गुरुसेवेचा विचार असे सदैव तिच्या मनी ।।

आध्यात्मिक त्रास होत असतांना श्रीकृष्णाचा धावा केल्यामुळे त्रास उणावून कृतज्ञतेचे महत्त्व लक्षात येणे आणि सकारात्मक रहाता येणे

श्रीकृष्ण म्हणाला, ‘वाईट शक्तींचे उद्दिष्ट ‘अस्थिर मनःस्थिती निर्माण करणे’, हे होते. तू माझी आठवण काढलीस आणि कृतज्ञताभावात राहिलीस; म्हणून वाईट शक्तींचे ते उद्दिष्ट पूर्ण झाले नाही. हेच तर मनाच्या स्थिर आणि सकारात्मक स्थितीचे महत्त्व आहे….

घरीही अनुभवायला न मिळणारा प्रेमभाव रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांच्या माध्यमातून अनुभवायला मिळणे

माझ्या आजारपणाच्या वेळी मध्यरात्री कु. वैष्णवी गुरव तिच्या खोलीत जात होती. तिने माझी विचारपूस केली आणि मला म्हणाली, ‘‘काका, काळजी घ्या आणि काही साहाय्य लागल्यास लगेच मला संपर्क करा.’’ तिचे बोलणे ऐकून मला भरून आले….

रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेचा आश्रम पाहून अधिवक्त्यांनी दिलेले अभिप्राय !

समाजात केवळ सामाजिक कार्य चालू असते. याउलट आश्रमामध्ये आध्यात्मिक कार्य चालू आहे. आश्रमातील सकारात्मक स्पंदनांमुळे सात्त्विक लोक येथे आकर्षिले जातात. येथील शिस्त, स्वच्छता आणि वातावरण चांगले आहे.