फोंडा, २७ मार्च (वार्ता.) – सनातन संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि विविध पक्षांचे आमदार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि भविष्यातील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत यश प्राप्त केल्याविषयी सनातननिर्मित श्री गणपतीचे चित्र भेट देऊन सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची त्यांच्या सांखळी येथील निवासस्थानी सनातन संस्थेचे श्री. तुळशीदास गांजेकर आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. गोविंद चोडणकर यांनी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. वास्कोचे भाजपचे आमदार श्री. कृष्णा (दाजी) साळकर, सावर्डेचे भाजपचे आमदार श्री. गणेश गावकर, सांगेचे भाजपचे आमदार श्री. सुभाष फळदेसाई, थिवीचे भाजपचे आमदार श्री. निळकंठ हळर्णकर, ‘मगोप’चे आमदार श्री. सुदिन ढवळीकर आणि डिचोली मतदारसंघाचे अपक्ष आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांची सनातन संस्थेच्या शिष्टमंडळाने प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले.