यंदाच्या वर्षापासून पुन्हा चालू होणार अमरनाथ यात्रा !

३० जूनपासून ११ ऑगस्टपर्यंत चालणार यात्रा !

नवी देहली – गेल्या २ वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे स्थगित ठेवण्यात आलेली अमरनाथ यात्रा यंदाच्या वर्षापासून पुन्हा चालू होणार आहे. या यात्रेतील  भाविकांना कोरोनाच्या संदर्भातील नियमांचे पालन करावे लागणार आहे.

जम्मू-काश्मीरच्या उपराज्यपाल कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार परंपरेनुसार ही यात्रा ३० जूनपासून प्रारंभ होऊन रक्षाबंधनाच्या दिवसापर्यंत, म्हणजेच ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यावर्षी अमरनाथ यात्रा ४३ दिवस चालणार आहे.