हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने सोलापूर येथील धर्मशिक्षणवर्गात येणार्‍या धर्मप्रेमी युवकांकडून देवतांच्या प्रतिमांचे विधीवत् अग्नीविसर्जन !

धर्मप्रेमी युवकांनी देवतांच्या प्रतिमा विधीवत् मंत्रपठण करून अग्नीत विसर्जन केल्या. ही कृती करण्यापूर्वी धर्मप्रेमींनी प्रार्थना केली आणि ‘ही कृती सेवा म्हणून करत आहे’, असा भाव ठेवला.

हिजाबवरून धर्मांधांचा उद्दामपणा !

‘द काश्मीर फाइल्स’ मधून सत्य मांडल्याविषयी दिग्दर्शकाला धमक्या मिळाल्यामुळे त्यांनाही ‘वाय’ दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. ही परिस्थिती भयावह आहे. पोलीस आणि प्रशासनाच्या भरवशावर हिंदू सुरक्षित जीवन जगू शकत नाहीत. हिंदूंनी व्यापक संघटन उभारून स्वरक्षणाचे धडे घेणे आणि इतरांना ते देणे, हा त्यावरील उपाय ठरेल !

संभाजीनगर येथे अधिवक्त्याला ठार मारण्यासाठी दीड लाख रुपयांची सुपारी; नातेवाइकांवर गुन्हा नोंद !

भूमीचा ताबा मिळवण्यासाठी अधिवक्ता किरण राजपूत यांना ठार मारण्याची सुपारी घेतलेल्यांनी त्यांना न मारण्यासाठी उलट १ लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकरणी अधिवक्ता किरण राजपूत यांच्या तक्रारीवरून नातेवाइकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

कुरकुंभ (पुणे) औद्योगिक वसाहतीतून साडेपाच कोटींचे केमिकल चोरीला !

कुरकुंभ, पुणे येथील औद्योगिक वसाहतीमधील ‘इटर्निस फाईन केमिकल’ या आस्थापनामधून २० किलो ‘रोडियम ऑन अल्युमिना’ नावाचे ५ कोटी ४७ लाख २० सहस्र ३४५ रुपयांचे केमिकल चोरीला गेले आहे.

शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपालाला १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले !

तालुक्यातील उत्तर पार्ले येथील एका शासकीय वसतिगृहाच्या महिला गृहपालाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने १५ सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना रंगेहात पकडले.

सातारा जिल्ह्यात अवैध लाकूड तस्करांवर कारवाई !

रात्रीची गस्त घालतांना पुणे-बेंगळुरू महामार्गावर उंब्रज गावाच्या सीमेत अवैध लाकूड तस्करी करणार्‍या ३ वाहनांवर वन विभागाने कारवाई करत १४ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला आहे.

हिंदू आणखी किती दिवस मार खात रहाणार ?

उत्तरप्रदेशच्या फाजिलनगर शहरात १९ मार्चच्या रात्री ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट पाहून घरी जाणार्‍या ३ हिंदु तरुणांवर ५ धर्मांधांनी चाकूद्वारे आक्रमण केले. त्यामुळे हे तीनही तरुण गंभीररित्या घायाळ झाले.

हिंदूंनो, ‘पावनखिंड’ चित्रपटातून ऐतिहासिक प्रेरणा घ्या !

हिंदूंचे होणारे धर्मांतर, लव्ह जिहाद, गोहत्या, धर्मांधांची मंदिरांवरील आक्रमणे, गड-दुर्ग यांवरील वाढत चाललेली इस्लामी अतिक्रमणे अशा विविध संकटांनी हिंदूंना सिद्धी जोहरच्या विळख्याप्रमाणे वेढलेले आहे. त्यासाठी ‘पावनखिंड’ चित्रपट मनोरंजन म्हणून न पहाता त्याकडे दायित्वाच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास चित्रपट निर्मितीचा उद्देश साध्य होईल.

छत्रपती शिवरायांचे संघटनकौशल्य !

आपल्या सर्व पुत्रांना एकत्रित करून परकीय सत्तांना या मातीतून उखडून फेकणार्‍या तलवारीच्या पातीची, वेदनांनी विव्हळ झालेली भूमाता वाट पहात होती, त्या वीर पराक्रमी पुत्राची ! अखेर तो दिवस उजाडला आणि तो वीर पुत्र जन्मला. भूमाता आनंदून गेली. फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीया, शके १५५१ म्हणजेच १९ फेब्रुवारी १६३० या दिवशी जिजाऊंच्या पोटी पुत्र जन्मला !

एवढे अर्ज प्रलंबित ठेवणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! एकातरी क्षेत्रात प्रशासनाचे कार्य कौतुकास्पद आहे का ?

‘वर्ष २०१६ ते २०२० या काळात ४ सहस्र १७७ विदेशी लोकांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले, तर १० सहस्र ६३५ अर्ज प्रलंबित आहेत.’