एस्.टी.मध्ये कंत्राटी चालकांची भरती होणार !

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एस्.टी.) कर्मचार्‍यांचा संप अद्याप चालू आहे. त्यामुळे एस्.टी. वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी शासनाने कंत्राटी चालकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

संभाजीनगर येथे परीक्षा चालू असतांना परीक्षा केंद्रांना बाहेरून कुलूप, तर वर्गात विद्यार्थ्यांकडून कॉपी !

शाळाच जर अशा प्रकारे सर्रासपणे विद्यार्थ्यांना नक्कल करण्यास साहाय्य करत असेल, तर तेथील विद्यार्थी कधीतरी आदर्श असतील का ?

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचारी यांना त्वरित निलंबित करण्याचा आदेश !

राज्यातील महानगरपालिका आणि नगरपालिका यांमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी लाचखोर अधिकारी किंवा कर्मचारी यांनी लाच घेतल्याचे आढळून आल्यावर त्यांना सेवेतून तात्काळ निलंबित करावे, असा आदेश नगरविकास विभागाने दिला आहे.

देवीहसोळ (जिल्हा रत्नागिरी) येथील सनातनचे ६५ वे संत पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा (वय १०० वर्षे) यांचा देहत्याग !

देवीहसोळ, तालुका राजापूर येथील सनातनचे ६५ वे संत पू. जनार्दन कृष्णाजी वागळेआजोबा (वय १०० वर्षे) यांनी १९ मार्च २०२२ या दिवशी सायंकाळी ७ वाजता त्यांच्या निवासस्थानी देहत्याग केला.

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांनी ३६ इमारती खरेदी केल्या ! – किरीट सोमय्या, भाजप नेते

शिवसेनेचे नेते यशवंत जाधव आणि त्यांच्या आमदार पत्नी यामिनी जाधव यांनी मुंबईत ३६ इमारती विकत घेतल्या असून त्यांचे मूल्य १ सहस्र कोटी रुपये असल्याचा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

पुण्यात सनबर्न होळीच्या पार्टीत तरुण-तरुणींचे मद्यप्राशन करून बेधुंद नृत्य !

देशाच्या युवा पिढीला व्यसनाधीन बनवणार्‍या आणि हिंदूंच्या सणांचे पावित्र्य भंग करणार्‍या ‘सनबर्न’ आणि अशा प्रकारच्या महोत्सवांचे आयोजन करणार्‍यांना कुणाचा पाठिंबा आहे, हेही पुढे आले पाहिजे !

महाराष्ट्र राज्य वैद्यकीय शिक्षक संघटनेच्या आंदोलनामुळे राज्यात ६० टक्के शस्त्रकर्मे थांबली !

शस्त्रकर्मे थांबणे म्हणजे जनतेचा जीव धोक्यात घालणे होय ! प्रशासनाने संवेदनशील विषय तातडीने सोडवल्यास संघटनांवर अशी कृती करण्याची वेळ येणार नाही.

खोटी देयके देऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्‍यांना अटक

खोटी देयके देऊन शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी राज्य वस्तू आणि सेवाकर विभागाने हिरालाल जैन आणि प्रमोद कातरनवरे या व्यापार्‍यांना अटक केली. शासनाचा महसूल बुडवणार्‍यांच्या विरोधात विशेष मोहीम हाती घेतली आहे.

१०० वेळा अटक केली, तरी अधिवेशनामध्ये सरकारचे अपप्रकार उघड करणार ! – प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

राज्यातील उत्तम असणार्‍या ४-५ बँकांपैकी एक असलेल्या मुंबै बँकेला जाणून-बुजून लक्ष्य केले जात आहे. मी राज्याचा विरोधी पक्षनेता आहे. या नात्याने सरकारचे अपप्रकार मी उजेडात आणत आहे.

१ कोटी ३० लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

दिंडोशी पोलिसांनी २ जणांना अटक करून त्यांच्याकडून १ कोटी ३० लाख रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात घेतले आहेत. गौरव कुमार प्रसाद आणि कृष्ण कुमार पंडित अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.