सातारा जिल्ह्यात अवैध लाकूड तस्करांवर कारवाई !

वन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह !

अवैध लाकूड तस्करी करणार्‍यांना कायद्याचे भय नाही, हे गंभीर !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, २० मार्च (वार्ता.) – रात्रीची गस्त घालतांना पुणे-बेंगळुरू महामार्गावर उंब्रज गावाच्या सीमेत अवैध लाकूड तस्करी करणार्‍या ३ वाहनांवर वन विभागाने कारवाई करत १४ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला आहे. यामध्ये रायवळ प्रजातीची लाकडे होती, तर दुसर्‍या घटनेत वडूज येथील मायणीमध्ये लाकूड तस्करी करणार्‍या ३ वाहनांवर कारवाई करत १६ लाख रुपयांचा मुद्देमाल शासनाधीन केला आहे. यामध्ये रायवळ कापीव मिश्र लाकूड होते. संबंधितांवर वनपाल आणि वनरक्षक यांनी भारतीय वन अधिनियमानुसार कारवाई केली आहे.